घटस्फोटानंतर आमिर 'हिच्याशी' लग्न करणार का?, सोशल मीडियावर ट्रोलर्सना उधाण

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे

Updated: Jul 3, 2021, 07:52 PM IST
घटस्फोटानंतर आमिर 'हिच्याशी' लग्न करणार का?, सोशल मीडियावर ट्रोलर्सना उधाण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघांनी आपापल्या15 वर्षाचं नातं संपविला आहे आणि सांगितलं की, त्यांनी आपापसातील संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

घटस्फोटाच्या बातमीने लोकांना बसला धक्का 
आमिर आणि किरणच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना हैराण केलं आहे. दोघांची जोडी एक परिपूर्ण जोडी मानली जात होती आणि या जोडप्याच्या अचानक विभक्त होण्याच्या बातम्या अनेक लोकांसाठी एक आश्चर्यचकित निर्णय होता. मात्र आता या घटस्फोटामागे एका अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. 

फातिमा सना शेख ट्विटरवर झाली ट्रेंड 
सोशल मीडियावर आमिर आणि किरणच्या घटस्फोटाची बातमी येताच बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख ट्रोल होऊ लागली. लोकांनी अभिनेत्रीचं नाव इतकं ड्रॅग केलं की, तिला ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात केली. लोकांचा असा विश्वास आहे की, तिच्यामुळेच हा घटस्फोट झाला आहे.

फातिमा आमिरला आपला गुरु मानते
फातिमा सना शेखने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ती आमिरला आपला गुरू आणि जीवन गुरु मानते, मात्र घटस्फोटाच्या बातमीनंतर लोक सोशल मीडियावर आमिर आणि फातिमा यांच्या कथित लिंकअपवरुन गॉसिप करत आहेत.