Kajol on Nysa Transformation : न्यासाच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली...

न्यासा देवगनमध्ये झालेला बदल पाहून अनेकदा तिला युजर्स प्रश्न विचारत असतात. सोशल मीडियावर कधी ती तिचे फोटो शेअर करते तर, कधी ती पापाराझींच्या कॅमेरात कैद होत असते.

Updated: Mar 28, 2023, 08:42 PM IST
Kajol on Nysa Transformation : न्यासाच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली...

मुंबई : सोशल मीडिवर जेवढे सेलिब्रिटी प्रसिद्ध असतात. तेवढेच स्टारकिड्सही प्रसिद्ध असतात. न्यासा देवगन ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त एक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर खूप कमी वयात तिचं मोठं फॅनफोलोईंग आहे. अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. कधी ती तिच्या फॅमिलीसोबत स्पॉट होत असते तर कधी ती तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत स्पॉट होत असते. अनेकदा यामुळे अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. 

न्यासा काजोल आणि अजय देवगणची मुलगी आहे. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाहीये. मात्र चाहते तिच्या बॉलिवूड पदर्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिने एखादा जरी फोटो सोशल मीडियावर शेअर केला की, तिचा तो फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतोच. आता काजोलने आपल्या लेकीबाबत एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती खूप चर्चेत आहे. कायम न्यासा तिच्या सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि रिवीलींग फोटो शेअर करत असते. 

तिच्यात झालेला बदल पाहून अनेकदा तिला युजर्स प्रश्न विचारत असतात. सोशल मीडियावर कधी ती तिचे फोटो शेअर करते तर, कधी ती पापाराझींच्या कॅमेरात कैद होत असते. तर कधी ती मित्रांसोबत पार्टी करताना स्पॉट होते. यामुळे तिच्यात होणारे बदलांकडे युजर्सचं लक्ष असतं आणि यामुळेच तिला ट्रोलर्स कायम ट्रोल करतात. न्यासा देवगण तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे सतत चर्चेत असते. नुकतच काजोलने मुलगी न्यासाच्या बदललेल्या लूकबद्दल स्पष्टपणाने सांगितलं आहे. काजोलच्या या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना काजोल म्हणाली की, मला गर्व आहे री, ती जिथे पण जाते, तिथे स्वत:ला ती स्वत:ला सन्मानाने सादर करते. काजोलने आपल्या मुलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काजोलने न्यासाचं कौतुक करण्याची एकही संधी सोडली नाही.
 
याचबरोबर काजोल पुढे म्हणाली की, ती आता फक्त १९ वर्षांची आहे. आणि ती तिचं आयुष्य एन्जॉय करत आहे. आणि हेच तिचं वय मजा करण्याचं आहे. मी तिला कायम सपोर्ट करते आणि करत राहीन. काजोल कायम तिच्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.