टॉपलेस झाल्यानंतर 'भल्लाळदेव'च्या भावावर या अभिनेत्रीचा लैंगिक शोषणाचा आरोप

अभीरामनं आपल्यावर हैदराबादच्या एका सरकारी स्टुडिओमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा श्री रेड्डीचा आरोप आहे.

Updated: Apr 11, 2018, 05:56 PM IST
टॉपलेस झाल्यानंतर 'भल्लाळदेव'च्या भावावर या अभिनेत्रीचा लैंगिक शोषणाचा आरोप title=

नवी दिल्ली : तेलगु सिनेइंडस्ट्रीत काम न मिळाल्यानं कपडे काढून आंदोलनाला बसलेली तेलगु अभिनेत्री श्री रेड्डी चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा श्री रेड्डीनं मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आता, श्री रेड्डी हिनं प्रोड्युसर सुरेश बाबू यांचा मुलगा आणि राणा दग्गुबातीचा भाऊ अभीराम दग्गुबाती याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय.

आंदोलना दरम्यान श्री रेड्डीनं अनेक टॉलीवूड प्रोड्युसर्सवर कास्टिंग काऊचचा आरोप केला होता. अभीरामनं आपल्यावर हैदराबादच्या एका सरकारी स्टुडिओमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा श्री रेड्डीचा आरोप आहे.

मुलाखतीत केला खुलासा

एका न्यूज चॅनलशी बोलताना अभिनेत्रीनं हा खुलासा केलाय. सुरेश बाबू यांचा छोटा मुलगा अभीराम यानं आपलं लैंगिक शोषण केलं. सोशल मीडियावरही तिचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत ती, 'सुरेश बाबू यांच्या छोट्या मुलानं मला फसवलंय. एक सरकारी स्टुडिओ आहे आणि तिथं टॅलेंटेड लोकांचं समर्थन केलं जातं. या स्टुडिओचा योग्य रितीनं वापर व्हायला हवा. परंतु, सुरेश बाबू यांच्या मुलगा मला त्या स्टुडिओमध्ये घेऊन गेला आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केले' असं म्हणताना दिसत आहे.

न्यूड होऊन विरोध प्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
श्री रेड्डीचं टॉपलेस आंदोलन

लैंगिक शोषणाचा आरोप 

याआधीही अनेक प्रोड्युसर्सवर लैंगिक शोषणाचा आरोप करत श्री रेड्डीने म्हटलं की निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी तिचं यौन शोषण केलं... आणि आपल्याकडे याचे पुरावेदेखील आहेत. निर्माते आणि दिग्दर्शकांनी इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष दाखऊन तिचे न्यूड फोटो काढले आणि व्हिडिओदेखील बनवला... परंतु, यानंतर देखील  आपल्याला काम नाही मिळालं, असा आरोप श्री रेड्डी हिनं केला होता. 

या प्रकरणात तेलुगू मूवीज आर्टिस्ट एसोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी राजा यांनी प्रतिक्रिया दिली की, 'ते श्री रेड्डीच्या आरोपांवरुन खूप दु:खी आहे. आम्ही नेहमी लोकांची मदत करतो. आम्ही अनेक महिलांची मदत केली आहे. ज्यांच्या विरोधात आरोप झाले त्यांच्य़ावर कारवाई देखील केली. श्री रेड्डीसोबत बोलतांना म्हटलं होतं की तिने यावं आणि तिची तक्रार मांडावी. पण ती सोशल मीडियावर हेली आणि जे काही केलं ते फक्त तिने प्रसिद्धीसाठी केलं.'