सारा अली खाननं सोशल मीडियावर 'लव्ह यू' म्हणत कोणाला दिली प्रेमाची कबुली?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे.

Updated: Jan 10, 2022, 04:56 PM IST
सारा अली खाननं सोशल मीडियावर 'लव्ह यू' म्हणत कोणाला दिली प्रेमाची कबुली?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. पण साराचं नाव जितकं अभिनयासाठी चर्चेत असतं. तितकंच तिचं नाव वादांमुळेही चर्चेत असतं.  आहे. अभिनेत्रीच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. ज्यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या नावाचाही समावेश आहे. सध्या अभिनेत्रीचं नाव एका व्यक्तीसोबत जोडलं जात आहे. ज्याच्यासोबत ती दररोज फोटो शेअर करत असते.

बॉलीवूडच्या नवोदित सुपरस्टार्सपैकी एक म्हणजे सारा अली खान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान येत्या काही दिवसांमध्ये चर्चेत आहेत. सारा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना चर्चेत येण्यासाठी चित्रपट करण्याची गरज नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमी काहीतरी घडतं ज्यामुळे ती चर्चेत असते.

यासोबतच सारा तिच्या मित्र-मैत्रिणींवर खूप प्रेम करते. आपल्या मित्रांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यात ती अजिबात संकोच करत नाही. नुकतचं इन्स्टा स्टोरीमध्ये तिने असंच काहीसं केलं आहे. त्यानंतर चर्चांना उधाण आलंय.

सारा अली खानचं नाव तिच्या सहकाऱ्यासोबत जोडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचं नाव सुशांत सिंग राजपूत आणि कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं आहे. कॉफी विथ करणमध्ये आलेल्या सारा अली खानने करण जोहरसमोर कार्तिकचं खूप कौतुक केलं यानंतर कार्तिक आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत असल्याची बातमी समोर आली होती.

यादरम्यान सारा आणि कार्तिक अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले. मात्र, नंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. आता साराचं नाव जहां हांडासोबत जोडलं जात आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.

जहां हांडाची एक इन्स्टाग्राम स्टोरी आहे. ज्यामध्ये सारा अली खान त्याच्यासोबत पोज देताना दिसतेय. असा अंदाज बांधला जात आहे की, सारा अली खाननेही हे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जंहाची स्टोरी अॅड केली होती आणि त्यावर लव्ह यू असं लिहिलं. सारा अली खानने शेअर केलेल्या या फोटोंमुळे त्यांच्या अफेअरची जोरात चर्चा सुरू झाली आहे. जहां हांडा 'केदारनाथ' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक होता.