Aamir Khan Netfilx Deal Cancelled : आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणकून मार खाल्ला आहे. बॉयकॉट लाल सिंग चड्ढाच्या ट्रेण्डमुळे चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे. चित्रपट अयशस्वी झाल्याने सदम्यात असलेल्या आमिर खानच्या चितेंत पुन्हा एकदा भर पडली आहे.
बॉयकोटचा ट्रेण्ड सुरू असतानाही प्रदर्शनापुर्वी आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून अनेक तर्कवितर्क लावले गेले होते. त्यातून बॉयकॉट ट्रेण्ड व्हायरल होण्याआधी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरेल असाही विश्वास बॉलीवूडकरांना वाटत होता. परंतु चित्र काही दिवसांतच पालटले आणि आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली नाही.
परंतु आता 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाबद्दल नवी बातमी समोर येते आहे. ती म्हणजे 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासाठी आमिर खानचा नेटफ्लिक्ससोबत असलेला करारही रद्द झाला आहे.
'लाल सिंग चड्ढा' चित्रपटगृहात आपली जादू दाखवू शकला नाही. हा चित्रपट आमिर खानच्या करिअरसाठी मोठी आपत्तीच ठरला. समोर आलेल्या माहितीनुसार 'लाल सिंह चड्ढा' रिलीज झाला नव्हता तेव्हा आमिर खान चित्रपटाचे डिजिटल अधिकार विकण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्सवर 'लाल सिंह चड्ढा' प्रदर्शित करण्यासाठी त्याने नेटफ्लिक्सकडून 150 कोटींहून अधिक रुपयांची मागणीही केली होती.
परंतु ही डील काही पुर्ण होऊ शकली नसल्याचे कळते. आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट रिलीज झाल्याच्या 6 महिन्यांनंतर ओटीटीवर चित्रपट आणण्याची अट ठेवली होती. थिएटर आणि ओटीटी रिलीजमधील अंतर कमी करण्यासाठी नेटफ्लिक्सचे सदस्य आमिरला बऱ्याच काळापासून सांगत होते. याशिवाय नेटफ्लिक्सने आमिर खानला 80 ते 90 कोटी दिले होते ज्यासाठी आमिर खान तयार नव्हता. खूप चर्चासंवादानंतर आमिरला नेटफ्लिक्सने त्याला 50 कोटींची डील दिली अशी माहिती समोर आली आहे.
आमिर खान आपल्या चित्रपटाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अधिक पैशात चित्रपट विकण्याचा प्रयत्न करत होता. तो नेटफ्लिक्सकडून 125 कोटींची मागणी करत होता. हा चित्रपट 300 कोटींहून अधिक कमाई करेल अशी आशा आमिर खानला होती. या अपेक्षेमुळे तो डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी फारसे प्रयत्न तेव्हा म्हणूनच करत नव्हता.
परंतु आता नेटफ्लिक्सही चित्रपट विकत घेण्याच्या प्रयत्नात आहे असे जाणवत नाहीये तेव्हा आमिरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.