Video: रणवीर ने 'खिलजी' केला अलविदा, असा केला नवा लूक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून सतत ‘पद्मावती’मुळे आणि या सिनेमाती लूकमुळे चर्चेत आहे.

Updated: Nov 7, 2017, 01:17 PM IST
Video: रणवीर ने 'खिलजी' केला अलविदा, असा केला नवा लूक title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून सतत ‘पद्मावती’मुळे आणि या सिनेमाती लूकमुळे चर्चेत आहे.

या सिनेमात त्याने अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली असून त्यासाठी त्याला अफलातून लूक देण्यात आलाय. हा सिनेमा आता रिलीज होणार आहे. त्यामुळे रणवीरने आपला लूक चेन्ज केलाय. नुकताच त्याने नवा लूक व्हिडिओ शेअर करून समोर आणलाय. 

रणवीर सिंहने ट्विटरवर ‘खिलजी’ला अलविदा केलाय. त्याने जूना लूक चेन्ज करताना व्हिडिओ शेअर केले आहेत. येत्या १ डिसेंबरला ‘पद्मावती’ रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे. सिनेमावरून काही वादही सुरू आहेत. त्यामुळे संजय लीला भन्साली यांनी सिनेमाचा विमाही उतरवला आहे. आता रणवीर १९८३ वर्ल्ड्कपवर आधारित सिनेमात बघायला मिळणार आहे.