Raj Kundra च्या अटकेनंतर शिल्पाला विचारला जातोय एकचं प्रश्न...

लोकांच्या  या प्रश्नाचं उत्तर शिल्पा देवू शकेल? 

Updated: Jul 20, 2021, 01:18 PM IST
Raj Kundra च्या अटकेनंतर शिल्पाला विचारला जातोय एकचं प्रश्न...

मुंबई : सोमवारी संध्याकाळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लिल चित्रपट चित्रीत  करण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रावर फक्त सॉफ्ट पॉर्न फिल्म तयार करण्याचे नाही तर व्हिडिओ ऍपवर अपलोड करण्याचे देखील आरोप करण्यात आले आहे. राजच्या या कृत्यामुळे तो आणि त्याचं कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियावर देखील हे प्रकरण तुफान तापलं आहे. सोशल मीडियावर पतीच्या कृत्याबद्दल शिल्पा सतत प्रश्न विचारले जात आहेत. 

'पतीच्या कृत्याबद्दल तुला काही माहिती नव्हतं का?' असा प्रश्न सतत शिल्पाला विचारला जात आहे . तर शिल्पा या प्रश्नाचं उत्तर देईल का? हे येत्या काळात समजेल. या प्रकरणी सोशल मीडियावर प्रत्येक जण आपले मत मांडत आहेत. 

दरम्यान, राज कुंद्राच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून कुंद्राने कारस्थान रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. सोमवारी जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली. 

 राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्राला अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता या प्रकरणी अजून किती रहस्य समोर येतील हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.