Kangana Ranut Buys Office by Selling Home : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतनं मुंबईच्या अंधेरी परिसरात एक नवं ऑफिस खरेदी केलं आहे. एकीकडे ही बातमी समोर आली असताना दुसरीकडे अशी चर्चा आहे तिनं तिचा वांद्रे परिसरातील मोठा बंगला हा विकत आहे. ऑफिसची ही जागा जवळपास 1.56 कोटी रूपयांसाठी खरेदी केली होती. दरम्यान, कंगनानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, प्रॉपस्टॅकद्वारे अॅक्सेस करण्यात आलेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्रीमधून एका गोष्टीविषयी कळलं की कंगना रणौतनं 'आर्क वन' नावाच्या एका बिल्डिंगमध्ये 19 व्या मजल्यावर ऑफिससाठी जागी खरेदी केली आहे. तिच्या या ऑफिसची स्पेस ही 38,391 रुपये स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असल्याचं म्हटलं जातं. हा सगळा व्यवहार हा 23 ऑगस्ट रोजी झाल्याचे म्हटले जाते. ज्यात कंगनानं 9.37 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस दिली.
दरम्यान, या नव्या रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की कंगनानं तिचा वांद्रे परिसरातील तिचा हा बंगला 40 कोटीसाठी विकला. खरंतर ही चर्चा या महिन्याच्या सुरुवातील सुरु झाली होती जेव्हा कोड एस्टेट नावाच्या एका युट्यूब चॅनलनं एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात असं सुचवण्यात आलं होतं की एका प्रोडक्शन हाऊसनं त्यांचं ऑफिस हे विकायला काढलं आहे. व्हिडीओमध्ये सरळ कंगनाचं नाव घेतलेलं नाही. पण त्यात दाखवण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ पाहता अनेकांनी ही कंगनाची प्रॉपर्टी असल्याचं म्हटलं. दरम्यान, असं म्हटलं जातं की वांद्रेमधील हा बंगला 285 स्क्वेअर मीटरच्या परिसरात हा बंगला बांधण्यात आला आहे. तर 3,042 स्क्वेअर फूटमध्ये इतका मोठा हा बंगला आहे. त्यात 500 स्क्वेअर फूटची पार्किंगची जागा आहे. या दोन मजली इमारतीची किंमत ही 40 कोटी आहे.
बंगला विकायला काढल्याची चर्चा असतानाच तिथं आता कंगनानं ऑफिस खरेदी केल्याची चर्चा आहे. कंगनाच्या बंगल्याच्या व्यवहारासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, तरीही बंगल्याची एकूण रक्कम पाहता त्या तुलनेत नव्या ऑफिसची खरेदी हा व्यवहार कंगनाच्याच फायद्याचा असू शकतो हीच चर्चा सध्या सुरु आहे.
कंगनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनात अडकलेला तिचा 'एमरजेंसी' हा चित्रपट येत्या 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात कंगनानं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. मिलिंद सोमन, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. राजकारणात सक्रिय असल्यानंतरही कंगना तिच्या या चित्रपटाचं योग्य रित्या प्रमोशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर फक्त प्रमोशन असल्यानं ती हे सगळं करू शकत असल्याचे म्हटले जात आहे. कारण राजकारणात संपूर्ण सक्रिय झाल्यानंतर तिला चित्रपट करायला वेळ मिळत नाही.