शाहिद कपूरनंतर आता करीना देखील करतेय दुसऱ्या बाळाची तयारी

काय म्हणाली करिना 

शाहिद कपूरनंतर आता करीना देखील करतेय दुसऱ्या बाळाची तयारी  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नांची जोरदार चर्चा रंगली आहे. तशीच चर्चा आहे पालक होण्याची. दुसऱ्यांदा आई बाबा होण्यामध्ये शाहिद आणि मिराने नंबर लावला आहे. 5 सप्टेंबर रोजी मीराने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. झैन असं या बाळाचं नाव. 

आता शाहिदच्या पाठोपाठ करिना देखील दुसऱ्या बाळाचा विचार करत आहे. हल्लीच करिना आपल्या बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत फिल्म क्रिटिक कोमल नहाटा टॉक शो Starry Nights 2 मध्ये पोहोचली. या ठिकाणी करिनाला दुसऱ्या बाळाबद्दल विचारलं. तेव्हा करिनाने सहज उत्तर दिलं, 2 वर्षानंतर. ... 2 वर्षानंतर सगळ्यांना आणखी एक तैमूर मिळणार आहे. आपल्याला माहित आहे तैमूर सध्या सगळ्यांचाच लोकप्रिय आहे. जिथे जिथे तैमूर जाईल तिथे लाइम लाइट असतं. आता करिना देखील दुसऱ्या बाळाचा विचार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

करिनाच्या या उत्तरावर अमृताने सांगितलं की, मी हिला सांगितलं की, जेव्हा कधीही तू दुसऱ्या बाळाचा विचार करशील तेव्हा पहिलं मला सांग. कारण मी देश सोडून जाईन. करिनाच्या या वाक्यानंतर कळलं की, लवकरच तैमूरला लहान भाऊ किंवा लहान बहिण मिळणार आहे. मुलाखतीत करिना म्हणाला की, सैफ आणि मला तैमूरला पॅम्पर करायला आवडतं. तैमूर देखील आता मीडियाकडे बघून रिअॅक्ट होतो आणि त्यांना छाप रिस्पॉन्स देतो.