close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नवाजच्या चित्रपटाचा ट्रेलर बघताच भाईजान म्हणतो...

सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानने नवाज आणि आथियाला आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Oct 14, 2019, 12:07 PM IST
नवाजच्या चित्रपटाचा ट्रेलर बघताच भाईजान म्हणतो...

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री आथिया शेट्टी स्टारर 'मोतीचूर चकनाचूर' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया तर दिल्याच, पण बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला देखील चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच भोवला आहे. चित्रपटाची कथा विवाह जमत नसल्याने त्रासलेल्या नवाज भोवती फिरताना दिसत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानने नवाज आणि आथियाला आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 'चित्रपटाचं ट्रेलर फारच छान आहे. भाईने सांगितले आहे की, तुम्हाला शुभेच्छा द्यायला...ऑल द बेस्ट' अशा शुभेच्छा सलमानने ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत. 

यूट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर ८५ पेक्षा ही अधिक चाहत्यांनी पाहिला आहे. १५ नोव्हेंबर रोजी 'मोतीचूर चकनाचूर' चित्रपटगृहात धडकणार आहे. नवाज आणि आथिया शिवाय चित्रपटात विभा चिब्बर, नवनी परिहार, विवेक मिश्रा, करूणा पांडे, संजीव वत्स, अभिषेक रावत, सपना सँड आणि उषा नागर सुद्धा झळकणार आहे.