...तर सलमान खान आणि ऐश्वर्या राय 'पद्मावती'मध्ये एकत्र झळकले असते !

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या आगामी चित्रपटाची सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

Updated: Aug 23, 2017, 02:57 PM IST
...तर सलमान खान आणि ऐश्वर्या राय 'पद्मावती'मध्ये एकत्र झळकले असते !  title=

मुंबई : संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या आगामी चित्रपटाची सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

अभिनेत्री दीपिका पादूकोन, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

दीपिका राणी पद्मावतीची, रणवीर सिंह अल्लाउद्दीन खल्जीच्या तर शाहीद कपूर रतन सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये ताणतणाव नसता तर ऐश्वर्या ही राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी संजयलीला भंसाळी यांची पहिली पसंत होती. 

काही मीडीया रिपोर्ट्सनुसार, 'पद्मावती' या ऐतिहासिक धाटणीच्या चित्रपटासाठी सलमान खान आणि ऐश्वर्या राय या जोडीचा विचार खूप वर्षांपूर्वीच केला होता. काही वर्षांपूर्वी या दोघांनी या चित्रपटात काम करण्यासाठी सहमतीदेखील दिली होती. पण ऐनवेळेस ऐश्वर्या रायने एक अट घालून संजय लीला भंसाळी यांना पेचात पाडले. त्यानंतर संजय लीला भंसाळींना चित्रपटासाठी नवी जोडगोळी शोधावी लागली. 

ऐश्वर्याची नेमकी अट काय होती ? 
'हम दिल दे चुके सनम'नंतर  सलमान आणि ऐश्वर्या ही हीट जोडी घेऊन संजय लीला भंसाळी 'पद्मावती' च्या निर्मितीला लागणार होते. मात्र दरम्यान या दोघांमधील संबंध  बिघडले. त्यावेळेस ऐश्वर्याने,जर सलमान अल्लाउद्दीन खल्जीची भूमिका साकारणार असेल तर मी चित्रपटात काम करेन अशी अट ठेवली. कारण संपूर्ण चित्रपटात या दोन भूमिकांचा एकमेकांसोबत एकही सीन नव्हता.पण ही अट सलमानखानला मान्य नसल्याने पुढे सारेच बारगळले. 

 १७ नोव्हेंबरला रिलीज होणार 'पद्मावती' 

आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंहनेदेखील रोमन स्टाईलमध्ये या चित्रपटाची घोषणा केली. पुढल्या वर्षी १७ नोव्हेंबरला 'पद्मावती' हा चित्रपट रिलीज होईल.