अभिषेकआधी एश्वर्या आधीच अडकली होती लग्नबंधनात? समोर आलेला फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का; पाहा फोटोमागचं सत्य

फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Updated: May 16, 2022, 01:30 PM IST
अभिषेकआधी एश्वर्या आधीच अडकली होती लग्नबंधनात? समोर आलेला फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का; पाहा फोटोमागचं सत्य title=

मुंबई : फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच तिने अनन्या पांडेचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती धमाल करताना दिसत आहे. आता फराह खानने तिच्या 2001 च्या घरातील पार्टीतील एक जबरदस्त आणि न पाहिलेला जुना फोटो शेअर केला आहे.

जुन्या फोटोमध्ये फरहान अख्तर, ऐश्वर्या राय, करण जोहर, राणी मुखर्जी आणि साजिद खान कॅमेऱ्यासाठी पोज देत आहेत. मात्र, या फोटोमध्ये ज्या गोष्टीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे ऐश्वर्या रायच्या भांगेतील सिंदूरने.

लग्नाच्या 6 वर्षांआधी ऐश्वर्याने सिंदूर का लावलं होतं
फराह खानने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच तो लगेच व्हायरल झाला. लग्नाआधी ऐश्वर्या रायने तिच्या मागेंत कोणाच्या नावावर सिंदूर लावला होतं. याबाबत नेटिझन्सही गोंधळले. पण, फराह खानच्या कॅप्शनने सगळं काही साफ केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर, आज म्हणजेच शुक्रवारी फराह खानने इन्स्टाग्रामवर हा जुना फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहिलं, '#flashbackfriday. हाऊसवॉर्मिंग 2001. माझ्या पहिल्या हाउसवॉर्मिंग पार्टीमध्ये, ऐश्वर्या देवदास करण जोहरच्या शूटमधून सिंदूर आणि डिझायनर कपड्यांशिवाय आली होती. आता फराहच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट झालं आहे की, हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा ऐश्वर्या तिच्या 'देवदास' चित्रपटाचं शूटिंग करत होती आणि ती तिच्या शूटवरून थेट फराहच्या घरी एका फर्टीला हजर राहण्यासाठी गेली होती.