'त्या चित्रपटात मला अश्लिल सीन'... ऐश्वर्या रायने मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा

 ऐश्वर्या राय केवळ सुंदरच नाही तर ती एक समंजस अभिनेत्री देखील आहे.

Updated: Oct 17, 2022, 05:33 PM IST
'त्या चित्रपटात मला अश्लिल सीन'... ऐश्वर्या रायने मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा  title=

मुंबई : ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड ठरली आहे. त्यामुळे तिने परदेशातील पत्रकारांना अनेकदा मुलाखती दिल्या आहेत. ऐश्वर्या राय केवळ सुंदरच नाही तर ती एक समंजस अभिनेत्री देखील आहे. त्यामुळे तिचा हजार जबाबीपणाही खूप प्रसिद्ध आहे. असाच एक प्रकार काही वर्षांपूर्वी ऐश्वर्यासोबत घडला. या मध्ये ती एका पत्रकाराला आपल्या सडेतोड उत्तराने गप्प करताना दिसली.

ऐश्वर्या रायला विचारण्यात आलं की, ती पडद्यावर न्यूड सीन करण्यास कंफर्टेबल का नाही?
एका व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने ऐश्वर्या रायला विचारलं की, ती स्क्रीनवर न्यूड सीन करण्यास का कम्फर्टेबल नाही?  ही मुलाखत कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान घेण्यात आली होती. ऐश्वर्या राय तिच्या 'द पिंक पँथर 2' या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. हा व्हिडिओ . Reddit वर पोस्ट करण्यात आला आहे.

 व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय म्हणताना दिसत आहे की, 'मी स्क्रीनवर कधीही न्यूड सीन कधी केला नाही.  आणि मला ते करायचंही नाही.' रिपोर्टर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ऐश्वर्या पुढे म्हणाली, 'मला असं वाटलं की मी माझ्या Gynecologist सोबत बोलत आहे.  तुम्ही एक पत्रकार आहात भाऊ तुम्ही कृपया त्याच्याशीच जोडलेले राहा.

ऐश्वर्या रायचा एटिट्यूड प्रेक्षकांना खूप आवडला आहे
ऐश्वर्या रायचा हा दृष्टिकोन प्रेक्षकांना आवडला आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे की, 'कॅमेर्‍यावर घेतलेली ही सर्वात बकवास मुलाखत आहे. त्याला बॉलीवूड म्हणजे काय याची अजिबात कल्पना नाही' तर दुसर्‍याने लिहिलं की, 'मला आता समजलं की, ती मुलाखत का देत नाही?  तर अजून एकाने म्हटलं आहे की, 'ती चुकीच्या प्रश्नांवर गप्प करण्यास चांगलीच सरस आहे.'

ऐश्वर्या रायनेही आपल्या स्पॉट रिस्पॉन्सने डेव्हिड लेटरमॅनला गप्प केलं
ऐश्वर्या राय याआधीही तिच्या मुलाखतींमुळे चर्चेत आली होती. एकदा तिने डेव्हिड लेटरमॅनलाही तिच्या स्पॉट रिस्पॉन्सने गप्प केलं होतं. न्यूड सीन द्यायचा नसल्यामुळे ऐश्वर्या रायने ट्रॉय चित्रपट सोडला होता.