Amitabh Bachchan Birthday : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी बुधवारी त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा केला आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. बच्चन कुटुंबियांनीही अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबियामध्ये (Bachchan Family) काही आलबेल नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. मात्र कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अशातच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai) शेअर केलेल्या एका फोटोमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. याचे फोटो ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ऐश्वर्या रायने आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत,नेहमी प्रेम करा, देव तुम्हाला आशीर्वाद देईल, असे कॅप्शन दिले. मात्र हाच फोटो श्वेता बच्चनने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केल्याचे नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. मात्र श्वेता बच्चन यांच्या फोटोमध्ये बिग बींसोबत आराध्या, नव्या, अगस्त्य आणि जया बच्चनही आहेत. पण ऐश्वर्याने तो फोटो क्रॉप केला आणि फक्त बिग बी आणि आराध्याचा फोटो शेअर केला.
जया बच्चन, नव्या नंदा आणि अगस्त्य नंदा यांना क्रॉप केल्यानंतर, फोटोमध्ये फक्त आराध्या अमिताभ यांना मिठी मारताना दिसत होती. दोघांनी हसून फोटोसाठी पोज दिली. अमिताभ गुलाबी आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले तर आराध्या मरून आउटफिटमध्ये सुंदर दिसत होती.
याच फोटोवरुन आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी ऐश्वर्याने पोस्ट केलेल्या फोटोवर तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही फोटो असा क्रॉप करुन टाकायला नको होता, असे एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने, तुम्हाला त्यांच्यासोबत फोटो पोस्ट नव्हता करायचा तर दुसरा करायचा होता. तो फोटो क्रॉप करायला नव्हता पाहिजे, असं फोटो क्रॉप करणं योग्य नाही, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, पण तुम्ही जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त काही पोस्ट का करत नाही, असे म्हटलं आहे.
वादाची चर्चा का सुरुय?
काही दिवसांपूर्वी पॅरिस फॅशन वीक झाला होता ज्यामध्ये ऐश्वर्या आणि नव्या या दोघींनी भाग घेतला होता. श्वेता आणि जया बच्चनही तिथे उपस्थित होत्या. श्वेताने नव्याचे फोटो शेअर केले आणि तिच्यासाठी खास पोस्ट केली. तिचा रॅम्प वॉक देखील पाहिला. पण श्वेताने ऐश्वर्याबद्दल काहीच पोस्ट केली नाही. तसेच नव्यानेही श्वेता आणि जयासोबतचे फोटोही शेअर केले होते. मात्र तिने ऐश्वर्यासोबतची कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. यामुळेच नव्याला ट्रोल करण्यात आलं होतं.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.