Mohit Raina : छोट्या पडद्यावरील 'देवों के देव महादेव' या लोकप्रिय मालिकेतून घरा-घरात पोहोचलेला अभिनेता मोहित रैनानं सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहेत. गेल्या वर्षी मोहितनं त्यांची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड अदिती शर्माशी लग्न गाठ बांधली. पण लग्नाच्या काही महिन्यातच त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली. पण जेव्हा त्याला या विषयी विचारण्यात आसे तेव्हा त्यानं या गोष्टीला नकार दिला. त्यानंतर मोहित बाबा होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यावरून घटस्फोटाच्या बातम्या खोट्या होत्या असं स्पष्ट झालं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याविषयी मोहितनं सांगितलं आहे.
मोहितनं नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली होती. तर घटस्फोटाच्या बातमीवर विचारण्यात येताच मोहित म्हणाला की 'जेव्हा आमच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती, तेव्हा माझी पत्नी ही 3 महिन्यांची प्रेग्नंट होती. मी ज्या ठिकाणी होतो जिथे नेटवर्क नव्हतं. त्यावेळी माझी पत्नी देखील माझ्यासोबत होती, खरंतर तिलाच मी फिरायला घेऊन गेलो होतो. जेव्हा मी ही बातमी वाचली तेव्हा कळलंच नाही की कसं या गोष्टीशी डील करू.'
पुढे मोहित म्हणाला की 'मला हे कळतं नव्हतं की माझ्या पत्नीला अखेर कसं समजवू. कारण ती या इंडस्ट्रीतील नाही, तिच्या घरच्यांना ही गोष्ट कशी समजावू.'
त्यानंतर मोहितनं वडील झाल्याची गोड बातमी सगळ्यांना दिली. 26 जून 2023 रोजी मोहितच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला होता. जेव्हा मोहित बाबा झाला तेव्हा त्यानं 8 महिन्यांची सुट्टी घेतली होती. हा संपूर्ण वेळ तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत वेळ व्यथीत करत होता. त्याला त्या दोघींसोबत क्वालिटी टाईम हवा होता आणि त्यानं तो लेकीच्या जन्मानंतर मिळवला. याविषयी बोलताना मोहित म्हणाला की 'ते 8 महिने त्याच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर महिने होते. आज मी जेव्हा पण शूटिंगला जातो तेव्हा मी त्या दोघींना खूप मिस करतो.'
हेही वाचा : 'सतत झगडत राहिलास खरा पण...', भावाच्या निधनानं बिनधास्त माधुरी पवार खचली
मोहित रैनाविषयी बोलायचे झाले तर 2004 मध्ये त्यानं 'अंतरिक्ष' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मालिका करण्याआधी मोहित हा मॉडेलिंग देखील करायचा. मोहित रैना 2005 मध्ये मिस्टर इंडिया या कॉन्सेटमध्ये सहभाग घेतला होता. पण त्याला यश हे 2011 मध्ये मिळालं. मोहितला 'देवों के देव महादेव' या मालिकेतून खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्यानं महादेव यांची भूमिका साकारली होती. आज देखील अनेक लोक त्याला महादेवाचं रुप म्हणून ओळखतात.