मुंबई : अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज यांनी 'बादशाहो' आणि 'रेड' मध्ये एकत्र काम केलयं.
नुकताच 'रेड' प्रदर्शित झाला असून हे दोघही प्रमोशनसाठी फिरत आहेत. दरम्यान अजय देवगणने इलियाची एक न आवडणारी सवय सांगितली.
इलियानाला साफसफाईची आवड आहे. शॉट्स दरम्यानही तिला कुठे घाण दिसली तरी ती साफ करायला सुरूवात करते.
इलियानाच्या या सवयीचा आपल्याला राग येत असल्याचे अजयने सांगितले.
'रेड' मधील माझी भुमिकाही हिरोसारखी आहे. पण खरे पात्र असल्याने थोडी अडचण झाल्याचे तो सांगतो.
कोणतीही पंच लाईन बोलताना रियल कॅरेक्टरप्रमाणे बोलव लागायच असे अजयने यावेळी सांगितले.