‘फन्ने खान’ सिनेमात ऎश्वर्यासोबत रोमान्स करणार हा अभिनेता

बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चनचा आगामी ‘फन्ने खान’ हा एक रोमॅंटिक सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा हे करणार आहेत.

Updated: Aug 31, 2017, 01:20 PM IST
‘फन्ने खान’ सिनेमात ऎश्वर्यासोबत रोमान्स करणार हा अभिनेता title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चनचा आगामी ‘फन्ने खान’ हा एक रोमॅंटिक सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा हे करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात ऎश्वर्याच्या हिरोचा शोध सुरू होता. यात अभिनेता आर माधवन, विक्की कौशल आणि राजकुमार राव यांच्या नावाची होती. आता हिरोच्या मुख्य भूमिकेसाठी राजकुमार राव याचं नाव कन्फर्म झालं आहे. 

काही आठवड्यांपूर्वी अशी चर्चा रंगली होती की, या सिनेमात ऎश्वर्यासोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत असतील, पण आता ती अफवा असल्याचे उघड झाले आहे. राजकुमार राव आणि ऎश्वर्या राय बच्चन हे पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. राजकुमार राव याने आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून आपलं वेगळं स्थान इंडस्ट्रीत तयार केलं आहे. त्याचा नुकताच बरेली की बर्फी हा सिनेमा गाजला. या सिनेमातील अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांनी राजकुमारला हस्तलिखित पत्र पाठवून त्याचे अभिनंदन केले होते.

‘फन्ने खान’ सिनेमाच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी एका वेबसाईटला सांगितले की, ‘या सिनेमाचं शुटिंग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या सिनेमात एका वडिल आणि मुलाच्या नात्यावर आधारित कथा बघायला मिळणार आहे. या सिनेमात ऎश्वर्या एका वेगळ्याच भूमिकेत बघायला मिळणार आहे. ऎश्वर्याची भूमिका, तिचा लूक एका आंतरराष्ट्रीय पॉप स्टारशी मिळता जुळता असेल’.