आकाश-नताशाच्या विवाह सोहळ्यात नीता अंबानीचे नृत्य प्रदर्शन

 विवाहाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. 

Updated: Mar 11, 2019, 04:49 PM IST
आकाश-नताशाच्या विवाह सोहळ्यात नीता अंबानीचे नृत्य प्रदर्शन

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि हीरे व्यापारी रसेल मेहतांची मुलगी श्लोका मेहता यांचा विवाहा सोहळा मोठ्या थाटात पार पाडला. या हायप्रोफाइल लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.  विवाहाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आकाश - श्लोकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात निता अंबानीने कृष्ण भजनावर आधारित एक नृत्य सादर केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. निता यांनी गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

nitaambani dance

A post shared by vaishnavi parsad verma (@vissh_verma) on

शनिवारी ९ मार्च रोजी आकाश - श्लोका विवाह बंधणात अडकले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे नव्याने तयार केलेल्या सम्मेलन केंद्रात लग्न समारंभ संपन्न झाला. हे केंद्र अंबानी कुटुंबा द्वारे चालवण्या जाणाऱ्या शाळेपासून थोड्याच अंतरावर आहे. या शाळेत आकाश - श्लोकाने एकत्र शिक्षण घेतले होते. या लग्न सोहळ्यात रजनीकांत, अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, प्रियंका चोपड़ा, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि एश्वर्या राय बच्चन यांच्या व्यतिरिक्त अनेक दिग्गज मंडळी सहभागी होते. 

१० मार्च रोजी आयोजीत केलेल्या स्वागत सोहळ्यात अनेक सेलेब्रिटी, राजकारणी, क्रिडा-कला क्षेत्रतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थितीत होते. या स्वागत सोहळ्यात आकाश - श्लोका फार सुंदर दिसत होते. आकाश ने शेरवानी घातली होती तर श्लोकाने सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता.