Urfi Javed ने खरेदी केली दुसरी गाडी! स्वत: साठी नाही तर...

Urfi Javed New Car Video: उर्फी जावेद च्या दुसऱ्या गाडीचा व्हिडीओ आला समोर... उर्फीनं आधी तिच्यासाठी एक गाडी घेतली आहे... मात्र, तिनंं आता एक नवीन गाडी घेतली असून ही तिच्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी घेतली आहे... उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Mar 5, 2023, 12:32 PM IST
Urfi Javed ने खरेदी केली दुसरी गाडी! स्वत: साठी नाही तर... title=

Urfi Javed New Car Video: 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच चर्चेत आहे. उर्फी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी उर्फीचं ड्रेसिंग सेन्स तर कधी कपड्यांमुळे वादात अडकनं. कधी उर्फी मोठ्या मोठ्या पार्टींमध्ये जाताना दिसते. फॅशनच्या बाबतीत उर्फी बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. आता उर्फी एका तिच्या कपड्यांमुळे किंवा व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत नाही तर उर्फीनं आता एक नवीन गाडी घेतली आहे. आता त्यातपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उर्फीनं ही गाडी तिच्यासाठी नाही तर तिच्या टीम आणि स्टाफसाठी घेतली आहे. याचा खुलासा उर्फीनं केला आहे. उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Urfi Baught New Car) 

उर्फीनं नुकतीच नवीन SUV खरेदी केली आहे. उर्फीनं नवीन गाडी घेतल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल आहे. या व्हिडीओत उर्फी पापाराझींना तिच्या नव्या गाडीवरून पर्दा काढताना दिसत आहे. त्याचा आनंग उर्फीनं तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत उर्फी केक कट करताना दिसत आहे. उर्फीनं तिची ड्रीम कार खरेदी केल्याचा आनंद झाल्याचं तिनं सांगितले आहे. उर्फीनं मरून रंगाची गाडी विकत घेतली आहे. ईटाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, उर्फीनं ही गाडी तिच्यासाठी नाही तर तिच्या स्टाफ आणि टीमसाठी घेतली आहे. त्याचं कारण म्हणजे तिच्या टीमला ज्या ठिकाणी शूटिंग आहे तिथं रिक्षानं यावं लागतं. ही गाडी पहिल्या गाडीपेक्षा मोठी आहे. या गाडीत माझा मॅनेजर, माझा मेकअप आर्टिस्ट, बाउंसरसोबत सगळे आरामात बसू शकतात. उर्फीनं गाडी घेतल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. (Urfi Baught Car For Her Team) 

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'मला वाटत नाही की...', Anil Kapoor यांनी लेकीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

दरम्यान, उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी उर्फीनं वेगळीच ड्रेसिंग केली होती. उर्फीनं केलेल्या ड्रेसिंगमध्ये तिनं सापाच्या डिझाइनचे कपडे परिधान केल्यानंतर असे दिसते की तिच्या शरीरावर साप आहेत. त्यानंतर उर्फी एका कार लॉन्च इव्हेंटमध्ये देखील दिसली होती. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत उर्फीनं पोज देखील दिलं. उर्फी अबू जैन- संदीप खोसला यांच्या फॅशन इव्हेंटमुळे देखील चर्चेत होती.