'हाऊसफुल्ल 4'मध्ये अक्षयकुमारसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला या जोडगोळीच्या 'हाऊसफुल्ल'ने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. सोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला तुफान दाद दिली. आता या चित्रपटाच्या सीरीजमधील चौथा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Mar 22, 2018, 05:26 PM IST
'हाऊसफुल्ल 4'मध्ये अक्षयकुमारसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री  title=

मुंबई : अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला या जोडगोळीच्या 'हाऊसफुल्ल'ने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. सोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला तुफान दाद दिली. आता या चित्रपटाच्या सीरीजमधील चौथा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

अक्षयकुमारसोबत दिसणार कृती सेनन  

'हाऊसफुल्ल 4' मध्ये अक्षयकुमार, रितेश देशमुखसोबत अभिनेत्री कृती सेनन झळकणार आहे. कृतीची बॉलिवूडमध्ये एंट्री टायगर श्रॉफसोबत झाली होती. 'हिरोपंती' या चित्रपटामधून कृतीची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. कृतीला 'बरेली की बर्फी' या चित्रपटातून वाहवा मिळाली. कृती सध्या अनेक फिल्ममेकर्सच्या आवडीच्या कलाकारांपैकी एक बनली आहे.  

साजिद नाडियाडवालाचं खास ट्विट  

 

साजिद नाडियाडवालाच्या प्रोडक्शनमध्ये बनल्या जाणार्‍या ' हाऊसफुल्ल 4' या चित्रपटात कृती अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. सोबतच कृतीचे 'हाऊसफुल्ल'च्या गॅंगमध्ये स्वागत केलं आहे. कृती सेननचा फोटो शेअर करताना त्यामध्ये अक्षय कुमार,रितेश देशमुख सोबत बॉबी देओललादेखील टॅग केले आहे.  

साजिदसोबत कृतीचा दुसरा चित्रपट  

साजिद नाडियाडलसोबत कृती सेननचा हा दुसरा चित्रपट आहे. कृतीचा डेब्यू चित्रपट 'हिरोपंती'देखील साजिदचा होता. बॉलिवूडमधील व्यस्त अभिनेत्रींमध्ये सध्या कृती सेननच्या नावाचाही समावेश होतो. 'बरेली की बर्फी' हा कृतीचा मागील चित्रपटही बॉक्सऑफिसवर सुपरहीट होता.  

2019 मध्ये होणार रिलीज  

'हाऊसफुल्ल'च्या मागील चित्रपटांनाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. लवकरच हाऊसफुल्ल 4 च्या शुटिंगला सुरूवात होणार आहे. हा चित्रपट 2019 
च्या दिवाळीमध्ये रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.