अंजलीबाईंनी या अभिनेत्यासोबत साजरा केला पाडवा

सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया हिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. राणा आणि अंजलीबाईंच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण अक्षया देवधर हिने राणा सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. खऱ्या आयुष्यात अंजलीबाईंची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.

Updated: Oct 23, 2017, 12:46 PM IST
अंजलीबाईंनी या अभिनेत्यासोबत साजरा केला पाडवा

मुंबई : सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया हिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. राणा आणि अंजलीबाईंच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण अक्षया देवधर हिने राणा सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. खऱ्या आयुष्यात अंजलीबाईंची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.

अक्षय आणि सुयशने पाडवा एकत्र साजरा केला. पाडव्याचे हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. अक्षयाने या फोटोसोबत म्हटले आहे की, माझे दक्षिणेवरचे प्रेम... खूप चांगले क्षण, पाडवा सेलिब्रेशन... जेव्हा तू माझ्यासोबत असतोस तेव्हा माझ प्रत्येकच दिवस ही दिवाळी असते. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सुयश यामध्ये दक्षिणात्य पेहराव्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे आता या फोटोवरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

Missing.... Distance is just a test to see how far love can travel

A post shared by Akshaya Deodhar (@akshayaddr) on

 

Love for south!  Happy moments! Padwa celebration When i am with you everyday is diwali for me ! Happy diwali !

A post shared by Akshaya Deodhar (@akshayaddr) on

 

You and me ! 

A post shared by Akshaya Deodhar (@akshayaddr) on