Alia - Ranbir चा साधासुधा विवाहसोहळा; फोटो तुफान व्हायरल

आलिया आणि रणबीरला लगीन घाई.... कपूर - भट्ट कुटुंबात उत्साहाचं वातावरण, 'त्या' एका फोटोमुळे सर्व काही समोर   

Updated: Mar 29, 2022, 02:51 PM IST
Alia - Ranbir चा साधासुधा विवाहसोहळा; फोटो तुफान व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चां दरम्यान एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. 

आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली असल्याचं समजत होतं. पण आता एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया आणि रणबीर एका मंदिराबाहेर उभे आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोघांचा फोटो पाहून, त्यांनी गुपचून लग्न उरकलं का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. पण आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

कारण सध्या व्हायरल होत असलेला फोटो रणबीर - आलियाच्या लग्नाचा नाही तर, राजस्थानमधील आहे. सध्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आलिया आणि रणवीरच्या रंगणाऱ्या लग्नाच्या चर्चांनंतर दोघे कधी लग्नाची तारखेची घोषणा करणार याकडे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

 कारण एका साडी फॅशन ब्रँड आणि डिजायनरसोबत आलिया आणि रणबीरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबाची उत्सुकता पाहात आलिया आणि रणबीरचं लवकरचं लग्न होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे.