आलिया भट्टनं 'बालिका वधू' साठी दिलं होतं ऑडिशन, तेव्हा इतक्या वर्षाची होती अभिनेत्री

आलियानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 21, 2022, 05:58 PM IST
आलिया भट्टनं 'बालिका वधू' साठी दिलं होतं ऑडिशन, तेव्हा इतक्या वर्षाची होती अभिनेत्री title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे आलिया ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलियानं खुलासा केला की तिच्या खासगी आयुष्यासोबत तिच्या प्रोफोशनल आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. 

आलियानं ‘सिट विद हिटलिस्ट’ या चॅट शोमध्ये अनेक गोष्टींविषयी सांगितले. यावेळी आलियाला प्रश्न विचारण्यात आला की 'संजय लीला भान्याळी तुझ्यासोबत बालिका वधू नावाचा चित्रपट करणार होते आणि त्यावेळी तुझे वय किती होते?' आलिया लगेच म्हणाली, 'जेव्हा त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मी 9 वर्षांची होते असं मला वाटतं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी आणखी काही वर्ष प्रतिक्षा करायला हवी.  पण नंतर त्यांनी चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे आलिया म्हणाली की, 'संजय लीला भन्साळी आजही मला बोलतात की मी चित्रपट न करण्याचा निर्णय घ्यायला नको होता. कारण तो शो लोकप्रिय शो झाला. मी सगळ्यांकडे दुर्लक्ष करत चित्रपट बनवायला हवा होता.'

आलिया पुढे म्हणाली, 'आम्ही बालिका वधूसाठी कॉस्च्युम रिहर्सल, लुक-टेस्टही केली होती. मी पुढे डोला रे डोला वर डान्स केला आणि जे काही ऑडिशनमध्ये होतं ते सगळं केलं. पण नंतर काय झालं ते कळेना. मी परत शाळेत गेले. सरांनी चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यासोबत काम करण्याची जिद्द माझ्या मनात कायम राहिली.'

 आलिया म्हणाली की, 'जेव्हा मी चित्रपटसृष्टीत आले, तेव्हा मला सांगण्यात आले की सर फक्त मोठ्या कलाकारांसोबतच काम करतात. मला माहित होतं की मला एकदा संधी नक्की मिळेल.' लवकरच आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा 9 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या भूमिका आहेत.