‘पद्मावत’ सिनेमा आणि दीपिकाबाबत आलिया भटची पहिली प्रतिक्रिया!

अनेक वाद सुरू असताना अखेर ‘पद्मावत’ सिनेमा रिलीज झाला आहे. 

Updated: Jan 25, 2018, 12:15 PM IST
‘पद्मावत’ सिनेमा आणि दीपिकाबाबत आलिया भटची पहिली प्रतिक्रिया! title=

नवी दिल्‍ली : अनेक वाद सुरू असताना अखेर ‘पद्मावत’ सिनेमा रिलीज झाला आहे. अनेक समीक्षकांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. दीपिकाच्या सुंदरतेचं कौतुक केलं जात आहे. तशा बॉलिवूडमध्ये अभिनेत्री ऎकमेकींचं कौतुक करताना कमीच दिसतात. पण आलिया भटने दीपिकाचं भरभरून कौतुक केलं आहे. 

आलियाकडून कौतुक

दीपिका पादुकोन, रणवीर सिंह आणि शाहिद कपूअर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावत’ रिलीज झाला आहे. या सिनेमात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत आहे. आलियाने तिघांच्याही भूमिकांचं कौतुक केलं आहे. 

दीपिकाला म्हणाली...

आलिया भटने ट्विट केले की, ‘डीपी(दीपिका पादुकोन) कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं. पण त्याहूनही सुंदर आहे तुझी हिंमत, तुझे डोळे आणि ते सगळं जे तू या सिनेमात केलं आहे’.

रणवीर आणि शाहिदला म्हणाली...

आलियाने रणवीरचं कौतुक करताना लिहिलं की, ‘रणवीर सिंह एक शानदार व्यक्ती आहे. तू हे केलं कसं? तुला बघून मी स्तब्ध झाली आहे. पद्मावत एकप्रकारे जादू आहे’. तर शाहिदबद्दल ती म्हणाली की, ‘शाहिद, तू प्रत्येक भूमिका अशी निभावतो जशी ती भूमिका तुझ्याशी जुळलेली आहे. तुझ्या अनेक सीन्सने माझ्या अंगावर शहारा आणला आहे’.

आलिया भट आणि रणवीर सिंह ‘गली बॉय’ सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा या सिनेमाचा पहिला सिनेमा असेल. आलिया आणि शाहिद ‘उडता पंजाब’ आणि ‘शानदार’ एकत्र दिसले आहेत.