Met Gala च्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच Alia Bhatt ची एंट्री, फोटो पाहून चाहते घायाळ

Met Gala 2023:  फॅशन विश्वातील सर्वात खास आणि सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला 1 मे रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडला. या कार्यक्रमात फॅशन डिझायनर्सपासून ते गायक आणि फिल्म स्टार्सचाही सहभाग होता. 

श्वेता चव्हाण | Updated: May 2, 2023, 09:11 AM IST
Met Gala च्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच Alia Bhatt ची एंट्री, फोटो पाहून चाहते घायाळ  title=
Alia Bhatt in Met Gala 2023

Alia Bhatt in Met Gala 2023: फॅशन विश्वातच नाही तर मनोरंजन विश्वातही सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मेट गाला (Met Gala 2023) हा कार्यक्रम मानला जातो. दरवर्षी या कार्यक्रमाला जगभरातील प्रसिद्ध कलाकार आपल्या फॅशनचा जलवा दाखवत असतात. भारतातूनही काही बॉलीवूड अभिनेत्री या मानाच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. 'मेट गाला' हा फॅशन शो काल 1 मे रोजी पार पडला. यंदाच्या मेटा गालामध्ये बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हीने पहिल्यांदा गलाच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. या आधी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी देखील मेटा गालाच्या रेड कार्पेट आपला ठसा उमटवाला होता. 

अभिनेत्री आलिया भट्टने मेट गाला 2023 च्या (Alia Bhatt in Met Gala 2023) रेड कार्पेटवर तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांना वेड लावले आहे. आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आलियाच्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट एखाद्या देवदूतापेक्षा कमी दिसत नाही. शाहीन भट्टनेही आलियाचे फोटो शेअर केले असून कॅप्शनमध्ये तिला देवदूत म्हटले आहे. आलिया भट्ट यावर्षी पहिल्यांदाच मेट गाला इव्हेंटचा सहभाग झाली होती.  

मेट गालाच्या रेड कार्पेटवर जगातील सर्वात मोठे सेलिब्रिटी त्यांच्या अप्रतिम फॅशन आणि आऊटफिट्ससह सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. या कार्यक्रमात सेलेब्स डिझायनर्सची ऑफबीट फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स सादर केला जातो. यावेळीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या रेड कार्पेटवर दिसून आल्या. अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच मेट गाला 2023 मध्ये सहभाग दाखवला असून आलियाने डिझायनर प्रबल गुरुंग क्रिएशन्सचा ड्रेस परिधान करून गाला डेब्यू केला. यासोबतच अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि ईशा अंबानी (Isha Ambani) देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shaheen Bhatt (@shaheenb)

मेट गाला इव्हेंट असतो तरी काय?  

मेट गाला हा न्यूयॉर्क शहरात दरवर्षी आयोजित मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारणारा कार्यक्रम आहे. हा हाय प्रोफाइल कार्यक्रम दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. याची 1946 मध्ये सुरुवात झाली. या महोत्सवातून जमा होणारा निधी कॉस्च्युम संस्थेसाठी वापरला जातो. गालाची दरवर्षी एक नवीन थीम असते, ज्यानुसार सेलिब्रिटी त्यांचे कपडे निवडतात. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सेलिब्रिटी शीर्ष फॅशन डिझायनर्सचे कपडे परिधान करतात आणि ते रेड कार्पेटवर सादर करतात.