आलियाला करायचं होतं वरूणसोबत लग्न, पण झालं असं...

वरूण आणि आलियाची 'अनटोल्ड स्टोरी'    

Updated: Jan 30, 2021, 12:28 PM IST
आलियाला करायचं होतं वरूणसोबत लग्न, पण झालं असं...

मुंबई : अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांनी  'स्टूडेंट ऑफ द इयर' (Student Of The Year) चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा दोघांच्या नावाची चर्चा देखील वाऱ्या सारखी पसरत होती. आलियाला वरूणसोबत लग्न करायची इच्छा होती, अशी चर्चा देखील रंगत आहे. दरम्यान, दिग्दर्शक करण जोहरने 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये अनेक प्रश्नांनी वरूणला घेरण्याचा प्रयत्न केला. या भागात वरूणने  आलिया भट्ट देखील त्याची अवडती अभिनेत्री आहे असं वक्तव्य केलं. 

वरूण आणि आलिया फक्त स्क्रिनवर नाहीतर खऱ्या आयुष्यात देखील उत्तम जोडीदार ठरले असते, असं मत करणने व्यक्त केलं. 'कॉफी विथ करणच्या' एका भागात वरूणने अभिनेत्री दीपिका पादूकोणसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण तेव्हा दीपिका अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. तरी देखील वरूण, दीपिकाची वाट बघण्यास तयार होता. 

पण जेव्हा आलिया कोणासोबत लग्न करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र तिने अभिनेता वरूण धवनचं नाव घतलं. पण असं काय झालं की जे आलियाच्या मनात होतं,ते वरूण मनात नव्हतं... या प्रश्नाचं उत्तर देताना वरून म्हणाला, आलिया माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्यासह मस्ती किंवा आनंद शेअर करताना मला फार चांगलं वाटतं असं वरूण म्हणाला. 

आलियाने कधीही एक मुलगी असल्याचा फायदा घेतला नाही. इंडस्ट्रीमध्ये अशा मुली फार कमी आहेत, असं देखील वरूण म्हणाला. विशेष म्हणजे वरूणचा हाच प्रामाणिकपणा आलियाला फार आवडतो. शिवाय अलिया कोणतीही गोष्ट वरूण सांगायची  झाली तर ती करणला सांगते. त्यामुळे वरूण आणि आलिया आजही चांगले मित्र आहेत.