'सगळे पुरूष एकसारखेचं असतात?' फोटो पोस्ट करत शाहीदच्या पत्नीने उपस्थित केला प्रश्न

शाहीद कितीही व्यस्त असला तरी तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबाला वेळ देतो. 

Updated: May 8, 2021, 04:26 PM IST
'सगळे पुरूष एकसारखेचं असतात?' फोटो पोस्ट करत शाहीदच्या पत्नीने उपस्थित केला प्रश्न

मुंबई : अभिनेता शाहीद  कपूर स्टारर 'कबीर सिंग' चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरला. 'कबीर सिंग' चित्रपटानंतर शाहीद कोणत्याचं चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला नाही. तर शाहीद लवकरचं 'जर्सी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहीद कितीही व्यस्त असला तरी तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबाला वेळ देतो. शाहीदची पत्नी मिरा राजपूत कपूर एक अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिची चर्चा कायम रंगलेली असते. 

मिरा सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. ती कायम पती शाहीद कपूर आणि दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करतच असते. आता देखील तिने इन्स्टाग्रामवार एक स्टोरी शेअर केली आहे. शिवाय फोटो पोस्ट करत तिने नेटकऱ्यांना एक प्रश्न देखील विचारला आहे. सध्या तिच्या या प्रश्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. 

फोटो पोस्ट करत मिराने 'सगळे पुरूष एकसारखेचं असतात?' असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. पाहायला गेलं तर शाहीद घरात कसा असतो... हे  मिरा शाहीदच्या चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मिराने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये शाहिदचे बुट  आणि मोजे कसेही पडलेले दिसत आहेत.  

शाहीदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कबीर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता शाहीद कपूर आता 'जर्सी'  चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटच्या कथे भोवती फिरणारा हा एक कौटुंबिक  चित्रपट आहे.