बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज!

Allu Arjun हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अल्लू हा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात आता तो कोणत्या बॉलिवूड चित्रपटामधून प्रवेश करणा याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Updated: Mar 4, 2023, 01:54 PM IST
बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज! title=

Allu Arjun Entry In Bollywood Industry : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अल्लू अर्जुनला त्याच्या पुष्पा या चित्रपटातून खरी लोकप्रियता मिळाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चर्चा होती की अल्लू अर्जुननं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा अपकमिंग चित्रपट 'जवान'ला नकार दिला होता. त्याचं कारण नक्की माहित नसताना असे म्हटले जात आहे की अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' च्या (Pushpa 2) चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे तो शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटासाठी वेळ देऊ शकत नाही. दरम्यान, आता अशा चर्चा सुरु झाल्या आहेत की अल्लू अर्जुन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यासाठी त्यानं निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि कबीर सिंह दिग्दर्शित संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत एक चित्रपट साइन केला आहे. 

अल्लू अर्जुन विषयी ही चर्चा टीसीरजनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे झाली आहे. टीसीरीजनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये निर्माते भूषण कुमार, प्रणय रेड्डी वांगा, सह-निर्माता शिव चानना आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिसत आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट असण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर समोर आलेल्या चर्चांनुसार अल्लू अर्जुन आणखी एका चित्रपटामध्ये दिसणार आहे त्या चित्रपटाचे नाव 'स्पिरिट' असे असणार आहे. दरम्यान, याच चित्रपटात प्रभासला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती देखील टी-सीरिज करणार आहे. 

पाहा पोस्ट - 

हेही वाचा : 'किती ते फाऊंडेशन...', मेकअपमुळे Shweta Bachchan ट्रोल

दरम्यान, बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या आधी बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड विरुद्ध टॉलीवूड यावर वाद सुरु होता. त्यावेळी अनेक कलाकार या वादावर मोकळे पणानं बोलताना दिसले होते. खरंतर लॉकडाऊननंतर बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरला पोहोचत नव्हते, तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ प्रचंड वाढली होती. ते पाहता या वादाला सुरुवात झाली होती. पण आता यासगळ्याकडे दुर्लक्ष करत बॉलिवूड कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. तर लवकरच अल्लू अर्जुन देखील बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार या आशेनं त्याचे चाहते उस्तुक आहेत. असं असले तरी देखील अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या 'पुष्पा 2' च्या (Pushpa 2) ची प्रतिक्षा करत आहेत.