'किती ते फाऊंडेशन...', मेकअपमुळे Shweta Bachchan ट्रोल

Shweta Bachchan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी श्वेतासोतब तिची आई जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी जया बच्चन यांना पाहूनही नेटकरी आणि पापाराझी आश्चर्यचकीत झाले. 

Updated: Mar 4, 2023, 12:21 PM IST
'किती ते फाऊंडेशन...', मेकअपमुळे Shweta Bachchan ट्रोल title=

Shweta Bachchan Troll : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan) ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच श्वेता फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी त्यांची फॅशन फिल्म 'मेरा नूर है मशहूर' या प्रीमियरला पोहोचली होती. यावेळी श्वेतासोबत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सेलिब्रिटींच्या यादीत लव्ह बर्ड्स अर्सलान गोनी आणि सुझेन खान, बाबिल, उर्फी जावेद, हुमा कुरेशी पासून सोनाली बेंद्रे, जया बच्चन, नीतू कपूर पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यापैकी एक हा श्वेता बच्चन नंदाचा आहे. दरम्यान, श्वेता बच्चनला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. (Shweta Bachchan Troll)

श्वेताचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. यावेळी श्वेतानं गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिच्या हातात छोटी पर्स देखील दिसत आहे. मात्र, सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष हे श्वेताच्या मेकअपनं वेधले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला श्वेता फोटोग्राफर्ससाठी पोज देण्यासाठी थांबते. अशातच काहीतरी होतं आणि श्वेता काहीतरी विचित्र एक्सप्रेशन देते. त्यानंतर घाईत पुढे जात श्वेता नीतू कपूर यांना भेटते आणि त्यांच्यासोबत पुढे जाते. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात श्वेताच्या मेकअपनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. इतकंच काय तर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्वेताच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'असे एक्सप्रेशन देते ते बघून असं वाटतयं की महत्त्वाचं काम सोडून आली आहे आणि तिला पोज देण्यासाठी सांगितलं जात आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कृपया तू जरा हातावर आणि पायावर सुद्धा सनस्क्रिन लाव म्हणजे सगळा रंग एकच वाटेल.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हिच्या चेहऱ्याचा आणि हाताचा रंग सेम वाटतं नाही आहे. चेहऱ्यावर किती फाऊंडेशन लावलं आहे. इतकंच काय तर ती त्या कपड्यांमध्ये अनकमर्फेटेबल असल्याचे दिसत आहे.' श्वेताच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : Swara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे 'ते' क्षण समोर!

दरम्यान, दुसरीकडे श्वेता बच्चनची आई जया बच्चन (Jaya Bachchan) यावेळी पापाराझींवर चिडल्या नाही तर त्यांनी त्यांनी स्माईल करत पोज दिल्या आहेत. जया बच्चन यांच्या अशा वागण्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे.