close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रियांका-निकच्या 'त्या' फोटोची इतकी किंमत

किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क  

Updated: Nov 12, 2018, 11:07 AM IST
प्रियांका-निकच्या 'त्या' फोटोची इतकी किंमत

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हेसुद्धा आता एकमेकांना साथ देण्यासाठी म्हणजेच विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रियांका आणि निकने लग्नाच्या आधी आपल्या मित्रमंडळींसोबत धमाल केल्याचंही पाहायला मिळालं. सध्या ते पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत व्यग्र झाले आहेत. 

मुख्य म्हणजे 'देसी गर्ल'च्या विवाह सोहळ्याविषयीची काही माहिती दर दिवसाआड समोर येत असून, अनेकांनाच थक्क करत आहे. सध्याही एक असंच वृत्त समोर आलं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाह सोहळ्यातूनही प्रियांका-निकला धनलाभ होणार आहे. ते नेमकं कसं...? हाच प्रश्न पडला ना तुम्हाला? 

प्रियांका आणि निकच्या लग्नातील फोटो हे एका आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये छापण्यात येणार आहेत. ज्यासाठी जवळपास २५ लाख डॉलर इतकी घसघशीत रक्कम 'देसी गर्ल' आणि निकला मिळणार आहे. 

अद्यापही याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. किंबहुना त्या मासिकाचं नावही गुलदस्त्यातच आहे. पण, फोटो ज्या किमतीला विकले जाणार आहेत तो आकडा पाहून मात्र अनेकांच्या भुवया उंचावत आहेत हे खरं...

प्रियांका गेल्या काही वर्षांपासून परदेशातच जास्त वावरत असली तरीही तिचा विवाह सोहळा मात्र भारतात पार पडणार आहे. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस येथे राजेशाही थाटात ती आणि निक विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या विवाह सोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत.