'कृष्णाची भूमिका साकारायला का घाबरतोय आमिर?

आमिरला मात्र आता या प्रोजेक्टची भीती वाटू लागलीय. आता आमिरला कसली भीती वाटतेय? 

Updated: Apr 13, 2018, 11:29 PM IST
'कृष्णाची भूमिका साकारायला का घाबरतोय आमिर? title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मध्यंतरी 'कृष्णा'ची भूमिका करायला आवडेल, असं म्हटलं होतं. त्याने ही भूमिका पडद्यावर साकारण्याचा तसा निश्चयही केला होता. यासाठी एका बिग बजेट सिनेमाची जय्यत तयारीही सुरू झाली होती. मात्र, आता आमिर स्वतःच ही भूमिका करू की नको? या द्विधा मनस्थितीत आहे. 

ही भीती कशाची?

गेल्या वर्षी आमिरने एक घोषणा केली होती की त्याला कृष्ण किंवा कर्ण पडद्यावर साकारायला आवडेल. आमिरने ही घोषणा करताच या प्रोजेक्टकडे अनेकांच्या नजरा वळल्या होत्या. एवढंच नाहीतर या मेगा प्रोजेक्टला फायनान्सरसुद्धा मिळाल्याचं म्हटलं जातं होतं. पण एवढं असूनही आमिरला मात्र आता या प्रोजेक्टची भीती वाटू लागलीय. आता आमिरला कसली भीती वाटतेय? 
 
ऐतिहासिक, पौराणिक सिनेमांना देशभरातून काही संघटनांचा तीव्र विरोध झाल्याची उदाहरणं नुकतीच पहायला मिळाली. त्यामुळे हे महाभारत पडद्यावर आणलं तर आपल्यालाही अशाच विरोधाला सामोरं जावं लागेल, ही चिंता आमिरला सतावू लागली.

सोशल मीडियावर ट्रोलिंग

कृष्णाची भूमिका करणं हे आमिरचं स्वप्न आहे. मात्र ही भूमिका पडद्यावर मांडताना विघ्नसंतोषी संघटनांचा विरोध तर होणार नाही ना? याची धाकधूक आमिरला वाटतेय. कारण जेव्हापासून आमिरने आपण महाभारतावर सिनेमा करणार असल्याचं जाहीर केलंय तेव्हापासून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात झालीय.

आमिरला अनेक टोमणे मारण्यात आले. अर्थातच यामुळे कोणत्याही कलाकाराला त्रास हा होणारच. आता या सगळ्या त्रासामुळे आमिर खंबीरपणे सिनेमा करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की नको ही भूमिका म्हणत हा सिनेमा सोडून देणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.