मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हीच आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे आजोबा म्हणजेच महानायक अभिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केला.
हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. "आराध्या किती मोठी झाली आहे, हे या फोटोवरून कळले."
T 2712 - When she will remind us how much she has grown .. Aaradhya on her 6th .. !! pic.twitter.com/irTrjuikAu
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2017
आराध्या ही स्टारकीड असून ती जन्मापासूनच लोकप्रिय आहे. तिची एका झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असले तरी काही काळ तिला मीडियापासून लांबच ठेवण्यात आले होते. मात्र आता ती चांगलीच मीडिया फ्रेंडली झाली असून ती स्वतः कॅमेऱ्यांना पोझ देताना दिसते.
२००७ मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विवाहबद्ध झाले आणि २०११ मध्ये त्यांना कन्यारत्न लाभले.