एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे अभिषेकनं वडिलांसोबत मुंबईत खरेदी केले 10 फ्लॅटस्; किंमत वाचून व्हाल अवाक्

अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना अमिताभ यांनी लेकासोबत मुंबईत 10 आलिशान फ्लॅटस् घेतले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Oct 25, 2024, 11:57 AM IST
एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे अभिषेकनं वडिलांसोबत मुंबईत खरेदी केले 10 फ्लॅटस्; किंमत वाचून व्हाल अवाक् title=
amitabh bachchan and abhishek bachchan buy 10 luxury apartments in mumbai 24 crores one flat

Bachchan New Property : गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय. खरं तर कुठल्या ना कुठल्या कारणाने बच्चन कुटुंब कायम चर्चेत असतं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि नावाजलेले हे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोटामुळे प्रकाशझोतात आलंय. पण सध्या बच्चन पिता-पुत्रांची दिवाळी शॉपिंगमुळे चर्चेत आलंय. दुसरीकडे दिवाळीपूर्वीच बच्चन कुटुंबात दिवाळीचा उत्साह पाहिला मिळतोय. कारण बाप लेक अमिताभ आणि अभिषेक या दोघींनी मुंबईत एक नाही, दोन नाही तब्बल 10 आलिशान फ्लॅट्सची खरेदी केली आहे. 

कुठे खरेदी केली मालमत्ता?

एका रिपोर्टनुसार, त्याने मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे 24.95 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. हे नव्याने बांधलेले अपार्टमेंट ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम निवासी प्रकल्प Eternia चा एक भाग आहे ज्यामध्ये 3 BHK आणि 4 BHK रेडी-टू-मूव्ह-इन फ्लॅट्स आहेत. बच्चन कुटुंबाने इथे एकूण 10 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. डीलमध्ये प्रत्येक अपार्टमेंटसाठी दोन समर्पित कार पार्किंग जागा देखील समाविष्ट आहेत. या प्रकल्पावर एकूण 1.50 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क लावण्यात आले आहे. असं सांगितलं जात आहे की अभिषेक बच्चनने यापैकी सहा अपार्टमेंट खरेदी केले आहेत, ज्याची किंमत सुमारे 14.77 कोटी रुपये आहे. उर्वरित चार अपार्टमेंट अमिताभ बच्चन यांनी विकत घेतले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

या गुंतवणुकीमुळे कुटुंबाची रिअल इस्टेटमधील गुंतवणूकही वाढली आहे. 2020 या वर्षात मुंबई महानगरात 25% पेक्षा जास्त सेलिब्रिटींच्या मालमत्तेचे व्यवहार झाल्याची नोंद आहे. असं म्हटलं जात आहे की त्यांनी अंदाजे 219 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 0.19 दशलक्ष चौरस फूट मालमत्ता वाचवली आहे. बच्चन कुटुंबाने ओशिवरा आणि मागाठाणे (बोरिवली पूर्व) येथील मालमत्तांसह 2024 मध्ये रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. या सगळ्याशिवाय अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत सुमारे 14.5 कोटी रुपये खर्चून 10,000 चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला आहे.