Birthday Special: महानायक अमिताभ बच्चन यांच्या इंटरेस्टींग गोष्टी

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात.

Updated: Oct 11, 2017, 08:46 AM IST
Birthday Special: महानायक अमिताभ बच्चन यांच्या इंटरेस्टींग गोष्टी title=

मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात.

फक्त काम करत नाही तर वेगळ्या भूमिकांच्या शोधात ते असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडमधील सर्वात ‘तरूण’ आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या अभिनय प्रवासबद्दल....

अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली असली तरी त्यांचा पहिला सिनेमा १९६९ साली आलेला ‘भूवा शोमे’ हा होता. या सिनेमात त्यांनी व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट म्हणून काम केले होते. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अमितजींना खरी लोकप्रिय आणि ओळख मिळाली ती १९७३ साली आलेल्या ‘जंजीर’ या सिनेमातून. या सिनेमापासून तयार झालेली त्यांची अ‍ॅंग्री यंग मॅन इमेज आजतागायत कायम आहे. 

पहिला पगार ८०० रूपये -

करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात अमिताभ बच्चन यांनी आकाशवाणीमध्ये अनाऊंसर म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यांना त्यांच्या आवाजामुळे नकार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी कोलकातामध्ये एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली. तेव्हा त्यांना महिन्याला ८०० रूपये पगार होता. त्यावेळी दिलीप कुमार आणि आशा पारेख या हे त्यांचे आवडते कलाकार होते. 

७ फ्लॉपनंतर पहिला हिट सिनेमा -

१९६९ ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमात त्यांना पहिली संधी मिळाली. हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर त्यांनी आणखी २० सिनेमांमध्ये काम केले. पण तेही फ्लॉप झाले. पण ‘जंजीर’ सिनेमाने त्यांचं नशीब बदललं. 

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार -

१९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २००१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांना एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.  

राजकारणात अपयश -

अमिताभ बच्चन यांनी राजकारणातही नशीब आजमावलं. पण त्यांना तिथे यश आलं नाही. नंतर ते इलाहाबादचे खासदारही राहिले होते. पुढच्या तीन वर्षात त्यांनी राजीनामा दिला होता. 

रेखा-जया नव्हत्या पहिलं प्रेम -

अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राने खुलासा केला होता की, जया किंवा रेखा त्यांचं पहिलं प्रेम नव्हत्या. त्यांचा एका महाराष्ट्रीय मुलीवर जीव जडला होता. एका ब्रिटीश कंपनीत ही मुलगी काम करत होती. अमिताभ आणि ती मराठी मुलगी एकाच कंपनीच काम करत होते. अमिताभ यांना तिच्याही लग्नही करायचं होतं. मात्र तिने त्यांना नकार दिला. त्यानंतर अमिताभ हे मुंबईत आले.

रोज ओढायचे २०० सिगारेट -

अमिताभ बच्चन तरूणपणी दिवसाला साधारण २०० सिगारेट ओढायचे. त्यासोबतच ते मद्यही प्यायचे. पण त्यानंतर त्यांनी सगळं बंद केलं. आता ते शुद्ध शाकाहारी आहेत. 

पेन आणि घडाळ्यांचे शौकीन -

अमिताभ बच्चन यांना पेन गोळा करण्याचा हौस आहे. त्यांच्याकडे वेगवेगळे १००० पेक्षा जास्त पेन आहेत. त्यासोबतच त्यांना घडाळ्यांचीही आवड आहे. एकदा घातलेली घड्याळ ते पुन्हा घालत नाहीत. 

दोन्ही हाताने लिहितात -

अमिताभ बच्चन यांना इंजिनिअर व्हायचं होत. त्यासोबतच त्यांना इंडियन एअरफोर्समध्ये भरती व्हायचं होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यांची खासियत म्हणजे ते दोन्ही हाताने लेखन करू शकतात. 
 

२४०० कोटींची संपत्ती -

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकदे तब्बल २४०० कोटींची संपत्ती आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे ११ लक्झरी कार्स आहेत.