Aishwarya Rai: असं म्हणतात की, एखाद्या व्यक्तीसाठी कुटुंब म्हणजे मोठा आधार. कुटुंब आनंदात म्हटलं की, सर्वच गोष्टींमध्ये आपोआपच सकारात्मकता अनुभवता येते. कलाविश्वाविषयी सांगावं, तर इथं काही अशी कुटुंब आहेत ज्यांच्याकडे पाहताना अनेकांनाच हेवा वाटतोय. यातलंच एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं कुटुंब. एखादा सण म्हणू नका किंवा मग एखादा समारंभ. बच्चन कुटुंबाच्या लेकिसुना एकत्र हजेरी लावत त्या कार्यक्रमांची शोभा वाढवताना दिसतात. पण, ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.... तेच इथंही लागू होतं.
अशा चर्चा आहेत की अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Net Worth) यांच्या कुटुंबात सध्या काहीसा तणाव आहे. माध्यमांसमोर ही मंडळी सर्वकाही व्यवस्थित असल्याचं भासवताना दिसले तरीही प्रत्यक्षात मात्र तसं नाही. किंबहुना असंही म्हटलं जातंय की याच मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बिग बींनी त्यांच्या एकूण संपत्तीची वाटणी अनेक भागांमध्ये केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार हल्लीच अमिताभ यांनी एक मोठं वक्तव्य केलं. जिथं त्यांनी आपल्या संपत्तीचा वासरदार फक्त मुलगा अभिषेक (abhishek bachchan) नसेल असं स्पष्ट सांगितलं. बिग बींच्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीच्या दोन वाटण्या होतील. यातला एक भाग श्वेता, तर दुसरा भाग अभिषेकला दिला जाईल. थोडक्यात बच्चन यांच्या तब्बल 2800 कोटी रुपयांच्या संपत्तीतून 1400 कोटी रुपयांचा एक भाग अभिषेक आणि दुसरा 1400 रुपयांचा भाग श्वेताला देण्यात येईल.
श्वेतानं अभिषेक बच्चनसोबत निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं ऐश्वर्याविषयीसुद्धा वक्तव्य केलं होतं. 'मला तिची (ऐश्वर्याची) एक सवय आवडत नाही, ते म्हणजे तिचं वेळेचं व्यवस्थापन ठीक नसतं....', असं श्वेता म्हणाली होती. त्यामागोमागच पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या आणि श्वेता एकमेकिंना टाळताना दिसल्या होत्या. हा तोच क्षण होता जेव्हापासून त्यांच्या नात्यात आलेला दुरावा सर्वांसमोर आला होता.
|
SCO
(19.4 ov) 152
|
VS |
ENG
155/5(18.2 ov)
|
| England beat Scotland by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IRE
(20 ov) 235/5
|
VS |
OMA
139(18 ov)
|
| Ireland beat Oman by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.