अमिताभ यांची केरळच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत

अमिताभ यांनी स्वत:च्या अनेक वस्तू देखील केल्या दान

Updated: Aug 23, 2018, 01:18 PM IST
अमिताभ यांची केरळच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत

मुंबई : केरळमध्ये सध्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर 450 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातून केरळला मदत पोहोचवली जात आहे. मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील 51 लाखांची मदत दिली आहे.

51 लाखांची मदत

बॉलिवूडचे अनेक कलाकार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील केरळच्या पूरग्रस्थांना मदतीचा हात दिला आहे. अमिताभ यांनी केरळला 52 लाखांची मदत दिली आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आणखी काही गोष्टी देखील दान म्हणून दिली असल्याचं कळतं आहे. ज्यामध्ये 80 जॅकेट्स, 25 पँट, 20 शर्ट आणि स्कार्फ्स याचा देखील समावेश आहे. 40 जोडी बुटांचा देखील यामध्ये समावेश आहे.

केरळ राज्याच्या मदतीसाठी अमिताभ यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आले आहेत.