अमिताभ बच्चन यांनी अफगाणिस्तानच्या युद्धादरम्यान 'खुदा गवाह'

मेगास्टार अमिताभ बच्चन यांची फॅन फॉलोईंग देशात नाहीतर परदेशातही प्रचंड आहे. 

Updated: Aug 17, 2021, 09:59 PM IST
अमिताभ बच्चन यांनी अफगाणिस्तानच्या युद्धादरम्यान 'खुदा गवाह' title=

मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांची फॅन फॉलोइईंग देशात तसंच परदेशातही प्रचंड आहे. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी चाहते हतबल होतात. अफगाणिस्तानातही त्यांच्या फॅनची काही कमी नाही. जेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या खुदा गवाह या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते अफगाणिस्तानात पोहोचले होते.

ही घटना 1991-92 मधील आहे. जेव्हा अमिताभ अभिनेत्री श्रीदेवीसोबत त्यांच्या 'खुदा गवाह' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अफगाणिस्तानला पोहोचले होते. मीडिया रिपोर्टनुसार, तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह यांच्या मुलीने त्यांच्या वडिलांना विनंती केली होती. की, मुजाहिदीनला एक दिवस लढाई थांबवण्याची विनंती करावी.

राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाहनी मुलीच्या सांगण्यावरून मुजाहिदीनला सांगितलं होतं की, 'अमिताभ बच्चनसारखा मोठा स्टार भारतातून अफगाणिस्तानात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे त्वरित लढाई थांबवण्यात यावी. कारण ते देखील शहरात फिरू शकतील आणि लोकही त्यांना पाहू शकतील.'

एका मुलाखतीदरम्यान अफगाणिस्तानचे राजदूत शायदा मोहम्मद अब्दाली यांनी हा खुलासा केला की, अमिताभ बच्चन अफगाणिस्तानातील अनेक लोकांना आवडतात. वास्तविक राष्ट्रपती नजीबुल्लाह हिंदी चित्रपटांचे चाहते होते. बिग बी यांचं अफगाणिस्तानात शाही सन्मानाने स्वागत करण्यात आलं होतं.

1992मध्ये रिलीज झालेला 'खुदा गवाह' हा चित्रपट अफगाणिस्तानमधील काबुल आणि मजार-ए-शरीफमध्ये जवळपास एक महिना शूट करण्यात आला. मात्र, या काळात अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन आणि श्रीदेवी यांची आई आपल्या मुलांची काळजी करत होत्या. तेजी बच्चन देखील चित्रपट निर्मात्यांवर खूप चिडल्या होत्या की, जर त्यांच्या मुलांना काही झालं तर.

अफगाणिस्तानमध्ये अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी शूटिंगसाठी मोठी गर्दी झाली होती. असं म्हटलं जातं की, लोक शुटींग दरम्यान अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून लाठ्या खात असत.