मुंबई : आगामी ११ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस आहे.
अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करत आहेत. मात्र, अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी म्हटलं की, यंदाच्या वर्षी वाढदिवस आणि दिवाळी आम्ही साजरी करणार नाही. त्यांनी या मागचं कारण स्पष्ट केलेलं नाहीये मात्र, असं मानलं जात आहे की अभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांचं निधन हे कारण आहे. याच वर्षी मार्च महिन्यात दिर्घ आजाराने ऐश्वर्याचे वडील कृष्णराज यांचं निधन झालं होतं.
T 2751 - NEWS BREAK : India thrash Aus in T20, Pink Panthers extraordinary convincing win, thunderstorm cancels shoot, 30 million on T pic.twitter.com/4dUn7h5N49
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 7, 2017
अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री ट्विट केलं, "भारतने टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. पिंक पँथर्सचा विजय झाला आणि ट्विटरवर ३ कोटी प्रशंसक. केवळ तुमच्या माहितीसाठी यंदाच्या वर्षी दिवाळी सेलिब्रेशन नाही."
T 2571 - .... and just for your information .. no Diwali celebration this year !! pic.twitter.com/ux3GvzJxWF
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 7, 2017
T 2571 - 75th Birthday ! Ya .. so .. ?? celebration, no celebration, going here, going there .. अरे छोड़ दो यार ! बस साँस लेने दो ! pic.twitter.com/oD44NFSgfO
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 7, 2017
'पीकू' स्टारने आपल्या ब्लॉगवर अधिक माहिती देताना म्हटलं की, "नाही, ७५वा वाढदिवस कुठल्याही प्रकारे साजरा करणार नाही, यंदाच्या वर्षी शहरात कदाचित नसेल."