भूमी पेडणेकर सोनम कपूरला मानते स्टाईल आयकॉन

येथे आयोजित 'ग्लिटर एक्झिबिशन २०१७' सोहळ्यात भूमी पेडणेकर हीने देखील हजेरी लावली होती.

Updated: Oct 8, 2017, 07:43 PM IST
भूमी पेडणेकर सोनम कपूरला मानते स्टाईल आयकॉन title=

मुंबई : येथे आयोजित 'ग्लिटर एक्झिबिशन २०१७' सोहळ्यात भूमी पेडणेकर हीने देखील हजेरी लावली होती.

भूमीच्या मते अभिनेत्री सोनम कपूर आपल्या देशातील फॅशन दिवा आहे. 

भूमीला  'ग्लिटर एक्झिबिशन २०१७' सोहळ्यात तुला कोणाची फॅशन स्टाईल आवडते ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा सोनम कपूर ही देशाची फॅशन क्वीन आहे. मला तिची फॅशन स्टाईल आवडते असे तिने उत्तर दिले आहे. सोनम तिची स्टाईल फार उत्तमप्रकारे हाताळते. तिच्या चेहर्‍यातून आणि स्टाईलमधूनही ती झळकते अशा शब्दांत भूमीने सोनमचे कौतुक केले आहे.

भूमी 'दम लगा के....' या चित्रपटातून रसिकांसमोर आली. तिच्या पुढील प्रोजेक्ट्सबाबत विचारणा करता,' अभिषेक चौबे दिग्दर्शित एका चित्रपटामध्ये भूमी झळकणार आहे. तसेच या चित्रपटाचे नाव ' चंबल' असू शकते अशी माहिती भूमीने दिली आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात होणार आहे. 

भूमी पेडणेकर 'टॉयलेट : एक प्रेम कथा' आणि शुभ मंगल या हीट चित्रपटामध्ये झळकली आहे.