close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कुत्र्याने बाळाच्या अंगावर टाकलं पांघरून, बिग बींनी शेअर केला व्हिडिओ

व्हिडिओसोबत शेअर केली भावनिक पोस्ट 

Updated: Oct 10, 2019, 09:26 AM IST
कुत्र्याने बाळाच्या अंगावर टाकलं पांघरून, बिग बींनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन जेवढे फिल्म इंडस्ट्रीत ऍक्टीव असतात तेवढेच ते सोशल मीडियावर देखील सक्रीय असतात. आता त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. इतका इमोशनल व्हिडिओ आहे की, तुम्हाला बघून देखील आनंद मिळेल. 

अमिताभ बच्चन हे प्राणीप्रेमी असल्याचं कळतं. या व्हिडिओत एक कुत्रा लहान मुलाच्या बाजूला आहे. हे बाळं झोपलंय आणि त्यावर हा कुत्रा पांघरून घालत आहे. हा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांना एवढा आवडला की, त्यांनी तो ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच हे तो कसं करतो? असा प्रश्न विचारत शेअर केला आहे. 

अमिताभ यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. बिग बींचे चाहते आणि प्राणीमित्रांनी यावर खूप कमेंट केले आहेत. बिग बींनी असे अनेक व्हिडिओ शेअर केला आहे. 

तसेच आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका लहान मुलाने काहीच कपडे घातले नाहीत. आणि तो त्याच्या सायकलवर बसत आहे. पण कपडे नसले तरीही त्याने हेल्मेट मात्र न चुकता घातले आहे. अमिताभ बच्चन हे यामधून एक उत्तम व्यक्ती आहेत हे स्पष्ट होतं. काहीच दिवसांपूर्वी भारतीय सिनेमातील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. देशभरातून त्यांना याकरता शुभेच्छा देण्यात आल्या.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन यांचा पहिला तमिळ सिनेमा 'सैरा नरसिम्हा रेड्डी' रिलीज झाला आहे. तसेच बिग बी लवकरच 'चेहरे', 'झुंड', 'ब्रम्हास्त्र', 'गुलाबो सिताबो' या सिनेमांमध्ये दिसणार आहेत.