महानायक अमिताभ यांनी हा व्हीडिओ पोस्ट केलाय...पाहा तुम्हाला आईला बिलगावंस वाटेल

महानायक अमिताभ बच्चन आज मातृदिन साजरा करत आहेत. 

Updated: May 9, 2021, 05:21 PM IST
महानायक अमिताभ यांनी हा व्हीडिओ पोस्ट केलाय...पाहा तुम्हाला आईला बिलगावंस वाटेल

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आज मातृदिन साजरा करत आहेत. बिग बींनी आज सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. बिग बींना पोस्ट केलेला व्हीडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखीस तुमच्या आईला बिलगावसं वाटेल. कोणताही महत्त्वाचा दिवस असला तर तो दिवस बिग बी त्यांच्या चाहत्यांसोबत साजरा करतात. आज त्यांनी मातृदिन अतंत्य अनोख्या पद्धतीत साजरा केला आहे. व्हीडिओ शेअर करत त्यांनी प्रत्येक दिवस हा मातृदिन असतो असं सांगितलं आहे. 

त्यांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये एक चिमणी कशा प्रकारे  तिच्या अंड्यांचं रक्षण करते हे दाखवलं आहे. एक चिमणी तिच्या अंड्यांजवळ उभी आहे. तेवढ्यात एक ट्रॅक्टर त्या ठिकाणी येतो आणि चिमणीच्या वरून जातो. तेव्हा ती आई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंड्यांत असलेल्या पिल्लांचा जीव  वाचवते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बिग बींनी शेअर केलेला व्हीडिओ फक्त एक व्हीडिओ नाही, तर त्यामध्ये अनेक भावना लपल्या आहेत. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईची जागा कोणीही पूर्ण करू शकतं नाही. बिग बी व्हीडिओ शेअर करत आपल्या आयुष्यात आई किती महत्त्वाची आहे. हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

बिग बींच्या कामा बद्दल बोलायचं झालं तर,  'द इंटर्न', 'झुंड', 'चेहरे', 'ब्रह्मास्त्र', 'मेडे' या  चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांना भेटायला येणार आहेत. पण मुंबईत कोरोनाचा कहर पाहाता चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. पण आता मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या मंदावत आहे, त्यामुळे लवकरचं सर्व काही पूर्व पदावर येईल अशी  शक्यता वर्तवण्यात येत आहे.