मुंबई : बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यावर्षात प्रचंड व्यस्त आहे. सध्या ते भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात अग्रगण्य असलेल्या कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. यानंतर बिग बी 'ब्रम्हास्त्र' या आगामी सिनेमात दिसणार आहेत. अशा व्यस्त शेड्युलमधूनही अमिताभ बच्चन आपल्याला सोशल मीडियावर ऍक्टिव दिसतात.
मग कोणताही सामाजिक प्रश्न असो वा कोणतही इतर औचित्य बिग बी कायमच आपलं मत मांडत असतात. आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांनी सामान्य ज्ञानात भर पडणारी माहिती शेअर केली आहे. बिग बींनी Selfie करता कोणता हिंदी शब्द आहे हे आपल्याला सांगितलं आहे.
T 3290 - For long there was an attempt to find a suitable Hindi word for 'Selfie' .. many suggestions came to me .. so .. not entirely satisfied I decided to coin one myself :
ITS :'वदय सह उसच :'
.
.
.
.
.
व्यतिगत दूरभाषित यंत्र से हस्त उत्पादित स्व चित्र
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 16, 2019
तब्बल ३८.५ मिलियन ट्विटरवर फॉलोअर्स असलेल्या बिग बींनी याबाबत ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, T-3290 बऱ्याच प्रयत्नानंतर Selfie करता हिंदी शब्द शोधून काढला आहे. माझ्याकडून मी प्रयत्न केला आहे. यामध्ये आणखी शब्दांचे स्वागतच आहे. असं म्हणतं हे ट्विट केलं आहे.
अमिताभ बच्चन सध्या आपल्या कामातही व्यस्त आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत बिग बींचा 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा येत असून त्यासोबतच 'झुंड' 'चेहरे' 'गुलाबो सिताबो' यासारखे सिनेमे देखील येत आहेत.