Amitabh Bachchan Prateeksha: अमिताभ बच्चन यांच्या घराला नाव कसे पडले 'प्रतीक्षा', बिग बी यांनी सांगितला मजेशीर किस्सा

Prateeksha: अमिताभ बच्चन यांचा बंगला 'प्रतीक्षा' प्रसिद्ध आहे. आपल्या लक्झरी बंगल्यापैकी एक आहे. आता बिग बी  यांनी आपल्या या बंगल्याला  'प्रतीक्षा' नाव कसे पडले याची माहिती दिली.

Updated: Sep 17, 2022, 09:28 AM IST
Amitabh Bachchan Prateeksha: अमिताभ बच्चन यांच्या घराला नाव कसे पडले 'प्रतीक्षा', बिग बी यांनी सांगितला मजेशीर किस्सा title=

Amitabh Bachchan House Name:मेगास्टार अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) आणि त्यांचे वडील आणि महान कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन  (Harivansh Rai Bachchan) यांच्या घराचे नाव 'प्रतीक्षा' कसे पडले याची माहिती खुद्द बिग बी यांनी सांगितली. 'कौन बनेगा करोडपती 14' या क्विझ आधारित रिअ‍ॅलिटी शोमध्ये 21 वर्षीय सीए पदवीधर प्रकाश शेट्टी याच्याशी संवाद साधताना घराबाबतचा किस्सा सांगितला. बिग बी म्हणाले, "हे नाव माझ्या वडिलांनी दिले होते आणि त्यांच्या वडिलांच्या कवितेत एक ओळ आहे. या ओळीतून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. ' येथे सर्वांचे स्वागत आहे, कोणाचीही प्रतीक्षा केली जात नाही' (इथे सर्वांचे स्वागत आहे. परंतु कोणीही वाट पाहत नाहीत).  

आईला रक्कम केली समर्पित 

शोमध्ये आलेल्या स्पर्धकाने आपला विजयी चेक त्याच्या आईला समर्पित केला, "ही रक्कम खूप मोठी आहे आणि आतापर्यंत मी फक्त इंटर्नशिप करत आहे. या महिन्यात माझ्या कंपनीची जॉइनिंगची तारीख होती, पण मी कंपनीला ही तारीख पुढे करण्याचे सांगितले, कारण मला या मेगा शोमध्ये सहभागी व्हायचे होते. 

म्हणून आईसाठी पहिला चेक

कौन बनेगा करोपतीमध्ये सहभागी स्पर्धक म्हणाला, पहिल्या पगारातून आईला घड्याळ दिल्याची आठवण झाली.  इंटर्नशिपमधून मला मिळालेला स्टायपेंड, माझा पहिल्या पगारात मी माझ्या आईला एक घड्याळ भेट दिले. आज मी माझ्या आईलाही इतकी मोठी रक्कम समर्पित करतो,"  

बहीण लग्न करेल 

त्याने यावेळी सांगितले की, तो शोमध्ये जिंकणार असलेली रक्कम त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवणार आहे आणि त्याच्या दिवंगत वडिलांनी मुंबईतील त्यांच्या घरासाठी घेतलेले कर्ज फेडणार आहे. 'कौन बनेगा करोडपती' सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहे