अमिताभ बच्चन यांच्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नात्यात फूट, पतीकडून अखेर सत्य समोर

अमिताभ बच्चन यांच्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या संसारात ठिणगी;  सत्य अखेर समोर  

Updated: Mar 23, 2022, 10:54 AM IST
अमिताभ बच्चन यांच्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नात्यात फूट, पतीकडून अखेर सत्य समोर title=

मुंबई :  इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चेचा विषय असतो तो म्हणजे कलाकारांची नाती... महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते स्टारकिड्सच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्रास रंगत असतात. सध्या 'स्मार्ट जोडी' शोमध्ये अनेक कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भाग्यश्री आणि पती हिमालय त्यांच्या नात्याबद्दल सांगताना दिसत आहेत...

दोघे सांगतात की, अमिताभ बच्चन यांच्यामुळे भाग्यश्री आणि पतीचं भांडण झालं. त्या भांडणाचं कारण होतं रंगपंचमी. भाग्यश्रीला रंग खेळायला आवडत नसल्यामुळे ती कधीचं रंग खेळली नाही, 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण एकदा बिग बींनी भाग्यश्री आणि पती हिमालयला होळी पार्टीसाठी आमंत्रित केलं. खुद्द बिग बींनी आमंत्रण दिल्यावर भाग्यश्रीला नकार देता आला नाही. त्यामुळे अखेर पतीसोबत ती होळी पार्टीसाठी गेली. 

पार्टीमध्ये पोहोचल्यानंतर अभिषेक आणि सैफ अली खान मागून धावत आले आणि भाग्यश्रीला पूलमध्ये ढकलून दिलं. त्यानंतर एक आठवडा भाग्यश्री आणि तिच्या पतीमध्ये दुरावा निर्माण झाला. पण अखेर हिमालयने मोठ्या मनाने भाग्यश्रीला माफ केलं. 

त्या दिवसानंतर आता भाग्यश्री होळी खेलते. बिग बींनी मला तेव्हा होळी पार्टीसाठी बोलावलं आणि मी त्या वर्षापासून होळी खेळू लागली असं देखील ती म्हणाली.