मुंबई : साऊथ सुपरस्टार सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेवून चाहत्यांचं हार्टब्रेक केलं आहे. सामंथा आणि नागा यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दोघे वेगळं होत असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर बरेच महिने चाहते प्रार्थना करत होते की त्यांना पुन्हा एकत्र येण्याची इच्छा आहे. मात्र अलीकडेच सामंथाने असं काही केलं आहे की, आता या दोघांना परत येण्यास वाव नाही हे स्पष्ट होत आहे.
खरंतर, चाहत्यांच्या अपेक्षेदरम्यान, समांथाने नागा चैतन्यला तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. इतकंच नाही तर नागाला अनफॉलो करण्यासोबतच समांथाने तिचे फोटो आणि घटस्फोटाशी संबंधित पोस्टही तिच्या अकाउंटवरून डिलीट केली आहे. ज्यामुळे समांथा आता नागाच्या आयुष्यात बायको म्हणून परत येणार नाही असं सूचित करत आहे.
लग्नाची साडी केली परत
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाने लग्नाची साडीही परत केल्याचं वृत्त आहे. लग्नात समांथाने तिच्या आजीच्या सासूबाईंची साडी नेसली होती आणि तिला या रुपात पाहून सगळेच दंग झाले होते. पण गेल्यावर्षी समंथा आणि नागा यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. आधी घर मग साडी आणि आता सोशल मीडिया पोस्ट हटवून अभिनेत्रीने एकामागोमाग एक चाहत्यांना सरप्राईज दिले आहेत.