आलियाच्या 'दिलबरो' गाण्यावर अमृताचा भन्नाट डान्स

अमृताची 'अमृत कला...'

Updated: Jul 4, 2021, 02:05 PM IST
आलियाच्या 'दिलबरो' गाण्यावर अमृताचा भन्नाट डान्स

मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर अमृत कला या नावाने नवा उपक्रम सुरू केलाय. याचाच दुसरा व्हिडिओ अमृताने आज आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत तिने राजी सिनेमातल्या दिलबरो या गाण्यावर ताल धरला आहे....कोरिओग्राफर आशिष पटीलसोबत अमृताने दिलबरोच्या गाण्यावर मनमोहक असं नृत्य सादर केलं...प्रत्येक रविवारी अमृत कलाचा नवा व्हिडिओ आपल्या समोर येणार आहेत. 

अमृताने तिच्या या भागात देखील कथक नृत्याचं सादरीकरण केलं आहे. सध्या या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमृताची ही कला पाहून सोशल मीडियावर तिच्या नृत्याचं कौतुक होत आहे. आता चाहते तिच्या पुढच्या व्हिडिओच्या प्रतिक्षेत आहेत.