होणाऱ्या पतीसोबतचं नातं तोडून अभिनेत्री कोणत्या अभिनेत्याच्या प्रेमात? 

या दोघांचे सध्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: May 6, 2022, 04:14 PM IST
होणाऱ्या पतीसोबतचं नातं तोडून अभिनेत्री कोणत्या अभिनेत्याच्या प्रेमात?  title=

मुंबई : अभिनेत्री एमी जॅक्सन अमेरिकन अभिनेता एड वेस्टविकसोबत दिसली आहे. असं बोललं जात आहे की, हे दोघं सध्या एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये एमी आणि एड एकमेकांच्या हातात हात घालून बाहेर फिरताना दिसत आहेत. 

दोघांचं सोशल मीडिया अकाउंट नीट पाहिल्यास दोघंही सध्या न्यूयॉर्कमध्ये असून काही वेळ एकत्र घालवत असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. एमीने हा फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. त्याचबरोबर एड वेस्टविक देखील या पार्श्वभूमीवर फोटो क्लिक करताना दिसला आणि त्याने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले.

एमीने 2019 मध्ये होणारा पती जॉर्ज पनायोटोसोबत तिच्या मुलाला अँड्रियासला जन्म दिला. एमी आणि जॉर्ज यांची जानेवारी २०१९ मध्ये एंगेजमेंट झाली होती. जरी दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता दोघांनीही आपले मार्ग बदलल्याचं दिसून येत आहे.