आनंद अभ्यंकरांची मुलगी विवाहबंधनात अडकली

मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा लगीनघाई पाहायला मिळत आहे.

Updated: Nov 17, 2017, 01:30 PM IST
आनंद अभ्यंकरांची मुलगी विवाहबंधनात अडकली  title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा लगीनघाई पाहायला मिळत आहे.

प्रार्थना बेहरे मागोमाग आता अभिनेता आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर विवाहबंधनात अडकली आहे. सानिकाच्या विवाहसोहळा १४ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईत पार पडला. किरण करमरकर, प्रसाद ओक, पुष्कर जोग, इला भाटे, भार्गवी चिरमुरे, प्रदीप वेलणकर अविनाश नारकर, हर्षदा खानविलकर यासारखी मंडळी या विवाह सोहळ्याला उपस्थित होती. अगदी साधेपणाने हा सोहळा संपन्न झाला. 

जुलैमध्ये सानिकाचा साखरपुडा झाला तेव्हादेखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले होते. प्रथमेश कुलकर्णीसोबत सानिका अभ्यंकर विवाहबंधनात अडकली. मात्र अद्याप प्रथमेश कुलकर्णी नेमकं काय करतो याची अद्याप माहिती मिळालेली नाही. 

सानिकाच्या या ‘मिस्टर परफेक्ट’ची ओळख अजूनही गुलदस्त्यातच आहे, असं म्हणावं लागेल. सानिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री चैत्राली गुप्तेने तिच्या इन्स्टाग्रामवर सानिकाचा लग्नानंतरचा फोटो पोस्ट केला आहे. 
त्याचप्रमाणे अनेकांनी सानिकाला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी म्हणून सानिकाची ओळख आहेच पण तिने स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. 

प्रत्येक उपस्थित कलाकाराने सानिकाला आणि प्रथमेशला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक कलाकाराचे आनंद अभ्यंकरांशी एक वेगळेच नाते होते. आणि हे ऋृणानुबंध आनंद अभ्यंकरांच्या जाण्यानंतर सानिकाने जोडून ठेवले. यावेळी अभिनेत्री चैत्राली लोकेश गुप्ते देखील उपस्थित होती. तिने देखील सानिकाला शुभेच्छा देत फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

Wish u both a happy married life....God bless u both...Lots of love to u all...Anand dada v missed u a lotttt today...

A post shared by Chaitrali Gupte (@chaitrali_lokesh_gupte) on

मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणूनही ती काम करतेय. २३ डिसेंबर २०१२ रोजी आनंद अभ्यंकर यांचं अपघातात निधन झालं होतं. यानंतर सानिकाने आनंद अभ्यंकरांवर ब्लॉग लिहायला सुरूवात केली. 
आणि त्याच ब्लॉगचं रूपांतर पुस्तकात झालं आणि १ ऑगस्ट रोजी अलाइव्ह (Alive) या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं.