कारकिर्दीच्या सुरुवातीलाच प्रेमाच्या त्रिकोणात फसला कार्तिक

अभिनेता कार्तिक आर्यनच 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं जातंय नाव   

Updated: Jun 7, 2019, 05:23 PM IST
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच प्रेमाच्या त्रिकोणात फसला कार्तिक      title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच नव्या चेहऱ्यांना पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं. या नव्या चेहऱ्यांमध्ये प्रसिद्धीझोतात आलेलं एक नाव म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन याचं. 'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. कलाविश्वात तो स्थिरावत नाही तोच, त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं. 

Ananya Pandey shuts down rumours of love triangle between her, Kartik Aaryan and Sara Ali Khan

अभिनेत्री सारा अली खान हिने कार्तिक आपला क्रश असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर पुढे कार्तिक आणि साराची भेट घडली. पाहता पाहता त्यांना एकत्र चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली. किंबहुना त्यांच्या आगामी चित्रपटापेक्षा त्यांच्यात असणाऱ्या नात्याचीच जास्त चर्चा होऊ लागली. एकिकडे कार्तिक आणि अनन्या यांच्या नात्यांच्या अफवा उठल्या तर, दुसरीकडे 'स्टुडंट ऑफ द इयर २' फेम अभिनेत्री अनन्या पांडे हिचंही नाव कार्तिकशी जोडलं गेलं. या दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आणि या अफवांनी अधिक जोर धरला.

एकंदरच आता संपूर्ण कलाजगतात या नवोदित कलाकारांच्या प्रेमाच्या त्रिकोणाचीच हवा असल्याचं स्पष्ट होत आहे. अनन्याने या चर्चा धुडकावून लावल्या असल्या तरीही आता या चर्चा काही शमण्याचं नाव घेत नाहीत, हेच खरं.