लग्नानंतरही या व्यक्तीसोबतच राहण्यास सैफची लेक आग्रही

पुन्हा एकदा अभिनेत्री सारा अली खान आली प्रकाशझोतात 

Updated: Jun 7, 2019, 05:21 PM IST
लग्नानंतरही या व्यक्तीसोबतच राहण्यास सैफची लेक आग्रही  title=

मुंबई : 'केदारनाथ' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्य़ा अभिनेत्री सारा अली खान ही सध्या यशाच्या वाटेवर चालत आहे. पदार्पणातच आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या साराने ‘सिम्बा’ या चित्रपटातूनही अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ज्यानंतर खऱ्या अर्थाने ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. सध्या अभिनेता सैफ अली खान याची ही लाडकी लेक चर्चेत आहे ते म्हणजे एका मुलाखतीमुळे.

'बाजार इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्यामनातील अनेक गोष्टी अगदी दिलखुलासपणे सर्वांसमोर ठेवल्या. एक स्टारकीड असल्यामुळे साराला या कलाविश्वात लगेचच संधी मिळाली होती, पण खऱ्या अर्थाने तिच्या अभिनय कौशल्यावर ही ओळख आणि हे यश संपादन केलं आहे.

सारा अली खान आईसोबत का पोहोचली पोलीस स्थानकात?

साराचं  तिच्या आईसोबतचं नातं तसं खूप खास. आई- मुलीपेक्षा त्यांच्यात मैत्रीचंच नातं अनेकदा पाहायला मिळालं आहे. याच नात्याप्रती असणारी ओढ पाहता आपल्याला लग्नानंतरही आईसोबतच राहायला आवडेल, असं साराने या मुलाखतीत स्पष्ट केलं. 

लग्नानंतरही मला तुझ्याचसोबत राहायचं आहे, असं जेव्हा सारा तिच्या आईला म्हणजेच अमृता सिंग हिला सांगते तेव्हा तीसुगद्धा चांगलीच वैतागते. पण, हे वैतागणं खरुखुरं नसून त्यातही नात्यातील ओलावा पाहायला मिळतो. आईपासून अधिक वेळ दूर राहिल्यास आपल्याला भीती वाटू लागते असं म्हणणाऱ्या साराच्या मनात दडलेले निरागस भावच या मुलाखतीत शब्दांवाटे सर्वांसमक्ष आल्याचं पाहायला मिळालं.